शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कोविडची भीती नाही? 115 पोलिसांची व्हॅक्सिनकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कोविडची एन्ट्री होताच जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शिवाय नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरत जिल्हा काेविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या तब्बल ११५ पोलिसांनी अजूनही कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे पुढे आले आहे.कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कोविडची एन्ट्री होताच जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शिवाय नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन करून घेण्यासाठी लॉकडाऊन काळात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांना नागरिकांकडून कोविड योद्धा असेही संबोधल्या गेले. सध्या कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरत असून जिल्हा काेविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. कोविडची लस ही कोविड मृत्यू रोखण्यासह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला बऱ्यापैकी ब्रेक लावू शकते. परंतु, अजूनही खाकीतील तब्बल ११५ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोविडची लस घेतली नसल्याने त्यांच्या मनात लसीबाबत काही गैरसमज तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. लस न घेणाऱ्यांमध्ये चार पोलीस अधिकारी तर १११ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.

१ हजार ६३६ पोलिसांनी घेतला पहिला डोस- जिल्ह्यात एकूण १ हजार ७५७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी १ हजार ६३६ पोलिसांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार ४९५ पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे सांगण्यात आले. तर अजूनही वैद्यकीय कारणे पुढे करून ११५ पोलिसांनी लस घेतलेली नाही.

लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी परिणामकारक आहे. त्यामुळे कुणीही लसीबाबत कुठलाही गैरसमज मनात बाळगू नये. गरोदर तसेच स्तनदा मातांसाठीही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिस