सात दिवसांत तालुक्यात १ लाख १७ हजार ७७७ झाडांचे रोपण

By admin | Published: July 9, 2017 12:41 AM2017-07-09T00:41:32+5:302017-07-09T00:41:32+5:30

शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो,

Planting of 1, 17, 777 trees in seven days in the taluka | सात दिवसांत तालुक्यात १ लाख १७ हजार ७७७ झाडांचे रोपण

सात दिवसांत तालुक्यात १ लाख १७ हजार ७७७ झाडांचे रोपण

Next

 २० शाळांचा सहभाग : मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जिवंत, सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो, तेव्हा निश्चित योजनेची फलश्रुती होते. याचा प्रत्यय वनविभागाच्या यंदाच्या वृक्षारोपण अभियानातून आला. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तळणीकर यांची कल्पकता व श्रमाने तालुक्यात सात दिवसांत १ लाख १७ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांनी वन विभागाचे सर्व कर्मचारी, तालुक्यातील २० शाळा, महाविद्यालय व शिक्षक तथा सामाजिक संस्था यांना सोबत घेत १ ते ७ जुलैपर्यंत १ लाख १७ हजार ७७७ झाडे लावून आपले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या वाट्याला १ लाख ९७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १ लाख १७ हजार ७७७ रोपे एकट्या वनविभागाला लावावयाची होती. उर्वरित ८० हजार रोपे विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेने लावायची होती. वन विभागाच्या वाट्याला आलेल्या १ लाख १७ हजार ७७७ रोपांपैकी चिंचोली वन परिसरात ३३ हजार, धावसा क्षेत्रात २७ हजार, नांदोरा वन परिसरात २२ हजार, सिंदीविहिरी परिसरात २७ हजार ५०० व मरकसूर परिसरात ७ हजार ७७७ झाडे तळणीकर यांच्या कल्पकतापूर्ण नियोजनातून १ ते ७ जुलै या कालावधीत लावण्यात आली.
सर्वप्रथम वनमजूर व इतर मजुरांकडून योग्य मापाचे खड्डे तयार करून घेण्यात आले. यानंतर प्रत्येक शाळेला विनंती पत्र देत प्रत्येकी ५० ते १०० मुले व शिक्षक मागविण्यात आले. झाडे लावणाऱ्या मुलांची ने -आण करण्याची व्यवस्था करण्यात आली. मॉडेल हायस्कूल, कस्तुरबा शाळा, राजीव गांधी, गुरूकुल कॉन्व्हेंट, सनशाईन स्कूल, इंदिरा कन्या शाळा, या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वन परिसरात जाऊन झाडे लावलीत. आयटीआय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. वृक्षारोपणाचा प्रारंभ १ जुलै रोजी सभापती मंगेश खवशी तसेच जि.प. सदस्य सुरेश खवशी, सरिता गाखरे, रोषणा ढोबाळे, शिवसेना तालुका प्रमुख संदीप टिपले यांच्या हस्ते करण्यात आला. मधल्या काळात माजी आमदार दादाराव केचे, विद्यमान आ. अमर काळे यांनाही वृक्षारोपणात सहभागी करून घेण्यात आले. २००० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला. समारोप ७ जुलै रोजी खरसखांडा वनपरिक्षेत्रात झाला. सर्व अधिकाऱ्यांनी या पद्धतीने काम केल्यास राज्य प्रदूषणरहित होण्यास मदत होऊ शकणार आहे.

मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जगली
मागील वर्षीही याच अभियानांतर्गत पळसकुंड वन क्षेत्रात ६० हेक्टरमध्ये १ लाख १२ हजार झाडे तळणीकर यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आली होती. सदर झाडांची देखभाल करण्यासाठी सतत तीन मजूर वर्षभर काम करीत होते. नियमितपणे खते टाकून, निंदण करून, प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्येक झाडाखाली सलाईनची रिमाकी बॉटल ठेवून त्याद्वारे पाणी देण्यात आले. परिणामी, मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८५ टक्के झाडे आजही जिवंत असून सन्मानाने डोलत आहेत. हा वृक्षारोपण मोहिमेतील आदर्श ठरू शकेल.

 

Web Title: Planting of 1, 17, 777 trees in seven days in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.