शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही नळ योजना कोरडीच

By admin | Updated: May 1, 2016 02:13 IST

चार दश्कांपासून पाणी पुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण अद्यापही पुलगाव शहर पाणी पुरवठ्याबाबत कोरडेच आहे.

पाणी पुरवठ्यासाठी धरणाचा आधार : चार दिवसांआड नळ येणारच्या चर्चेने महिलांचा त्रागापुलगाव : चार दश्कांपासून पाणी पुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण अद्यापही पुलगाव शहर पाणी पुरवठ्याबाबत कोरडेच आहे. शहराचा पाणी पुरवठा पुर्णत: धरणातून पाणी सोडण्यावर अवलंबून आहे. शहराला शनिवारी पाणी पुरवठा न झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली.शहराच्या सीमेवरून बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर व लोअर वर्धा धरणामुळे नदी रखरखत्या उन्हात कोरडी पडले. पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून शहर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली; पण शहराचा वाढता व्याप, नियमबाह्य नळ जोडण्यास, तांत्रिक दृष्ट्या सदोष असलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणी पुरवठा योजना दरवर्षी उन्हाळ्यात डोके वर काढते. धरण बांधल्यामुळे नदी कोरडी पडते. धरणातून पाणी सोडले तर पाणी साठविले जात नाही. यामुळे काही वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्चाचा बंधारा नदीवर बांधण्यात आला; पण माती खचल्यामुळे तो बंधाराही पाणीसाठा करण्यात अपयशी ठरला. कायमस्वरूपी योजना म्हणून २०१० मध्ये ९६ कोटी रुपये खर्चाचा पुलगाव बॅरेजचा प्रस्ताव मांडला गेला. मार्च २०१२ पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण कंत्राटदाराची कोट्यवधी रुपयांची देयके न मिळाल्याने बॅरेजचे काम रखडले. यामुळे अद्यापही बॅरेजचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पाणीसाठा नसल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गत कित्येक वर्षांपासून वर्षभराचे बील भरूनही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. शहरात शनिवारी पाणी पुरवठा न झाल्याने प्रत्येक चवथ्या दिवशी पाणी पुरवठा होणार असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई टाळण्यासाठी न.प. ने लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)