शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ४८ हजार खातेधारक : प्रायोगिक तत्त्वावर लोणी, येणगावची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आतापर्यंत जवळपास ६० हजार खातेधारकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. डाटा अपलोड करण्याचे काम सुरु असून आज राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर निवडक जिल्ह्याच्या प्रत्येकी दोन गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्याच्या दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांच्या समावेश आहे.महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.त्यानुसार वर्धा जिल्ह्यात २ लाख ४८ हजार खातेधारक असून आतापर्यंत ६० हजार खातेधारकांची सर्व माहिती गोळा करुन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. शासनाने आज प्रायोगित तत्त्वावर पहिली यादी जाहीर करण्यात आली.याकरिता देवळी तालुक्यातील लोणी व कारंजा (घाडगे) तालुक्यातील येणगाव येथील १६६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकºयांना आता प्रमाणिकरण करुन घ्यावे लागणार आहे. यासाठी महसूल विभाग आणि बँकेचे कर्मचारी कामाला लागले आहे. त्यामध्ये काही त्रुट्या असल्यास दुरुस्ती करण्यात येणार आहे.९९ शेतकऱ्यांची झाली ओळखपरेडपहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता आधार कार्ड, बँक पासबूक, यादीत नमुद असलेला मोबाईल क्रमांक, यादीत नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक लिहून जवळच्या आपले सरकार केंद्र, बँक शाखा किंवा स्वस्त धान्य दुकानावर आपले प्रमाणिकरण करायचे आहे. आतापर्यंत पहिल्या यादीतील १६६ शेतकऱ्यांपैकर ९९ शेतकºयांनी प्रमाणिकरण केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे येत्या दोन ते तीन दिवसात प्रमाणिकरण केले जाणार आहे.२८ फेब्रुवारीनंतर दुसरी यादी होणार जाहीरपहिली यादी ही प्रायोगिक तत्त्वावर जाहीर केली असून यात काय अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास केला जाणार आहे.पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लगेच २८ फेबु्रवारीला दुसरी यादी जाहीर होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन हगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन पुढील शेतीकरिता पीककर्ज घेणे सुलभ व्हावे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.