शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

या रस्त्याच्या बांधकामाचा कं त्राट ठाणे येथील एस. कंस्ट्रक्शन नामक कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे अभयकुमार सिंग यांनी शेतकरी शार्दुल वांदिले यांच्या मालिकेच्या शेत सर्व्हे क्रमांक-१२ मधील शेतातील मुरुमाच्या मोबदल्यात सुपीक माती देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वसानानुसार कंत्राटदाराने शेतातील ४ हजार पेक्षा जास्त मुरुम खोदून नेला. या उत्खननामुळे शेतात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे.

ठळक मुद्दे्रप्रहारची मागणी : ४ हजार ब्रास मुरुमाची केली चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या सेवाग्राम मार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील एफ-२ लेआऊटमधील रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता कंत्राटदाराने शेतकºयाची दिशाभूल करुन शेतातील ४ हजार ब्रासपेक्षा अधिक मुरुमाची चोरी केली. याप्रकरणी प्रहारच्यावतीने शेतकऱ्यांची बाजू मांडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.या रस्त्याच्या बांधकामाचा कं त्राट ठाणे येथील एस. कंस्ट्रक्शन नामक कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे अभयकुमार सिंग यांनी शेतकरी शार्दुल वांदिले यांच्या मालिकेच्या शेत सर्व्हे क्रमांक-१२ मधील शेतातील मुरुमाच्या मोबदल्यात सुपीक माती देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वसानानुसार कंत्राटदाराने शेतातील ४ हजार पेक्षा जास्त मुरुम खोदून नेला. या उत्खननामुळे शेतात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. त्यानंतर शेतकरी वांदिले यांनी कंत्राटदाराला मातीबद्दल विचारणा केली असता टाळाटाळ केली जात आहे. असाच प्रकार सर्व्हे क्रमांक १३७/१ व सर्व्हे क्रमांक १३० मध्येही घडला आहे. या शेतामधून मुरुमाची उचल करण्यासाठी कंत्राटदाराने प्रशासनाकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र कंटदाराने कोणतीही परवानगी न घेता शेतकºयाचे शेत पोखरण्यासह शासनालाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला. शेतकºयांनी या प्रकाराची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांना मिळताच त्यांनी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे रितसर तक्रार करुन शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तहसीलदार डुडुलकर यांनी मंडळ अधिकारी डेहने व तलाठी नांदूरकर यांना सोबत घेऊन मौका चौकशी केली. त्यांनी चौकशीचे आदेश देऊन संबंधित कंत्राटदार व एमआयडीसी व्यवस्थापक यांना विचारणा करण्यासाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आदिवासी विकास युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी, प्रहारचे शैलेश खोसे, शार्दूल वांदिले, सुरज आत्राम उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी