शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पसायदान म्हणजे विश्वसुखाची प्रार्थना

By admin | Updated: January 7, 2016 02:46 IST

सामान्य माणसे स्वत:साठी ईश्वराकडे काही मागतात. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी काहीही न मागता विश्वसुखाची मागणी केली आहे.

सुधीर बोधनकर : कावळे स्मृती व्याख्यानमाला वर्धा : सामान्य माणसे स्वत:साठी ईश्वराकडे काही मागतात. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी काहीही न मागता विश्वसुखाची मागणी केली आहे. मानवाला सतत विवेकाने वागण्याची आणि विकाराला टाळण्याची प्रेरणा देणारी प्रार्थना म्हणजे पसायदान होय, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ. सुधीर बोधनकर, नागपूर यांनी केले. डॉ. वि.गं. कावळे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या खरे सभागृहात विदर्भ साहित्य संघ शाखा आणि कावळे परिवाराद्वारे डॉ. बोधनकर यांचे ‘पसायदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सल्लागार डॉ. सुनीता कावळे, शाखा समन्वयक सचिव प्रदीप दाते, डॉ. बैंदूर यांची उपस्थिती होती. डॉ. बोधनकर पुढे म्हणाले, पसायदानाचे नऊ श्लोक म्हणजे मराठी साहित्यातील नवरत्नांचा हार होय. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर मातृहृदयी असल्यानेच माऊली या पदाला सार्थ ठरतात. ज्ञानेश्वर केवळ मानवाच्या हिताचाच विचार करीत नाहीत, तर संपूर्ण सजीवसृष्टीच्या सुखाची मागणी करतात. त्यांचे पसायदान हे जीवनाचे शास्त्र आहे आणि वैगुण्याविरुध्द लढणारे शस्त्रही आहे. यावेळी डॉ. भैरवी काळे यांनी भक्तिरचना सादर केली. डॉ. बैंदूर यांनी वि.गं. कावळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. संचालन ईशान कावळे यांनी केले. अतिथींचा परिचय रंजना दाते यांनी दिला. योगेंद्र कावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ. स्मिता कावळे, दीप्ती बगे, प्रा.राजेंद्र मुंढे, प्रा. पदमाकर बावीस्कर, प्रशांत पनवेलकर, गंगाधर पाटील, प्राचार्य विजय व्यास आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)