शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहनतळाची वानवा

By admin | Updated: March 1, 2017 00:58 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

वाहतुकीचा बट्ट्याबोळ : बजाज चौकातही ‘ट्रीपल सीट’चा प्रवास वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या बजाज चौकातूनही दुचाकींवर ‘ट्रीपल सिट’चा प्रवास होताना दिसतो. शिवाय शहरात वाहनतळाची वानवा असल्याने रस्त्यावरच वाहने ‘पार्क’ केली जात असल्याचे चित्र आहे. नगर पालिका व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. शिवाय शहरात वाहनांसाठी पार्किंग झोन निर्माण करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाला पार पाडावी लागते; पण दोन्ही यंत्रणांना जबाबदारीचा विसर पडल्याचेच सध्या दिसून येत आहे. बजाज चौकात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची व्यवस्था करण्यात आली आहे; पण ती अत्यंत तोकडी आहे. शिवाय ही व्यवस्था केवळ भाजी बाजार वा बस स्थानकावर जाणाऱ्या वाहनधारकांच्या उपयोगाची आहे. बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. मुख्य मार्गावरही वाहने कुठे ठेवावी, हा प्रश्न निर्माण होतो. आर्वी नाका चौकासह मुख्य मार्ग, बॅचलर रोड व अन्य मार्गांवरही वाहने रस्त्याच्या कडेला तथा कधी रस्त्यावरच पार्क करावी लागतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांचे सध्या या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) भरधाव दुचाकी ठरताहेत अपघातास कारण शहरातील मुख्य मार्गासह अन्य मार्गांवरही दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांत तर बजाज चौक या मुख्य ठिकाणीही दुचाकींवर ट्रीपल सिट बसवून वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. मंगळवारी भर दुपारीच बजाज चौकातून विद्यार्थी, युवक दुचाकीवर ट्रीपल सिट जाताना दिसून आले. मंगळवारी बजाज चौक परिसरात एकही वाहतूक पोलीस दिसत नव्हता. याचाच फायदा हे दुचाकी चालक घेत असावेत. शहराच्या अन्य भागातही दुचाकीवरून तिघे जातानाचे चित्र नित्याचे झाले आहे. शिवाय भरधाव दुचाकींमुळे मुख्य मार्गावरील अपघात नित्याचेच झाले आहेत. परिणामी, वृद्ध, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.