शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

लॉज मालकच निघाला चोर

By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST

येथील शारदा लॉज मधून मोबाईल व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता लॉजचा मालकच

दोघांना अटक : १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्तवर्धा : येथील शारदा लॉज मधून मोबाईल व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता लॉजचा मालकच चोर असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे कमलेश हरिश जाधव वय (३0) वर्षे, प्रफुल संतोषवार वय (२७) दोन्ही रा. भामटीपुरा  अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश दिगंबर पाटील वय २१ वर्षे व त्याचा मित्र अतुल पाटील दोन्ही रा. जामनेर जि. जळगाव हे पोलीस भरतीकरिता वर्धेला आले होते. ते शहरातील शारदा लॉज येथे  थांबले. दरम्यान शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्री लॉजच्या त्यांच्या खोलीतून रक्कम व मोबाईल चोरीला गेली. सोबत आणखी तिघांचे पैसे व मोबाईल चोरीला गेले होते. याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८0, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषन विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर निशाने, गजानन गहुकर, आकाश चुंगडे, धर्मेंद्र अकाली यांच्या चमूने  पोलीस निरीक्षक बुरडे यांच्या मार्गदर्शनात केली. यात सदर चोरी लॉज मालकाने त्याच्या वाहन चालकाच्या मदतीने केल्याचे समोर आले. यावरून लॉज मालक कमलेश जाधव (३0) व त्याचा चालक प्रफुल संतोषवार (२७) दोन्ही रा. भामटीपुरा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल व रोख ३ हजार ५0 रुपये असा एकूण १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)