शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील एकमेव तीर्थक्षेत्र रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: August 4, 2014 23:54 IST

श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत येणारा नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत अनेक वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना

टाकरखेड : श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत येणारा नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत अनेक वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना दशकापासून त्रास सहन करावा लागत आहे़ एकीकडे विकासाचा कांगावा केला जातो तर दुसरीकडे भाविकांची अवहेलना होत असल्याचे दिसते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे़ नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत कित्येक वर्षांपासून परिपूर्ण दुरूस्तच करण्यात आलेला नाही़ या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचलेले आहे़ बऱ्याच ठिकाणी रस्ता जमिनीत रूतला असून डांबरीकरण उखडले आहे. यामुळे या रस्त्याने ये-जा करताना खड्डे व चिखलातून मार्ग शोधावा लागतो. कित्येक वर्षांपासून भाविकांना टाकरखेड येथे जाताना मरणयातनाच सोसाव्या लागत आहेत़ येथे महाशिवरात्रीला जन्मोत्सव तर रक्षाबंधनला पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो़ दोन्ही उत्सवाला विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे एक लाख भाविक ये-जा करतात़ वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते; पण त्यांना हा रस्ता आजपर्यंत कधीही व्यवस्थित झाल्याचे दिसले नाही. रस्ता कधी एका बाजूने व्यवस्थित असला तर दुसऱ्या बाजूने नादुरूस्तच दिसतो़ लहानुजी महाराज देवस्थानात उत्सव असला की, थातूरमातूर मुरूम टाकून खड्डे बुजविले जातात; पण कायम उपाययोजना केल्या जात नाहीत़ अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या रस्त्याची दुरूस्ती कधी होणार, हे अधिकारीही स्पष्टपणे सांगू शकत नाहीत़ हजारो भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदर रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करावे, अशी मागणी लहानुजी महाराज देवस्थान समितीसह परिसरातील नागरिक व भाविकांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)