शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:54 IST

Wardha news agriculture अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  

ठळक मुद्दे हातातला घास मातीमोल होण्याचं संकटकांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : -अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  परीसरातील कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या   नागपुरसह   जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनामुळे बंद आहेत. विजांच्या कडकडाटासह   पावसाने रविवारी रात्री व दुपारपर्यंत कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरीने  हजेरी लावल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

शेतकऱ्यांची धावपळ

गेले तीन- चार दिवस ढगाळ वातावरण होते हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण, शनिवारला दुपारपासुनच  वातावरणात अचानक बदल झाला.  रविवारचे रात्री व दुपारपर्यंत व सोमवारला तळेगांवसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने  हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.

कांद्याची काढणी, पावसाची हजेरी संकट वाढवणारी

शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत भिजल्यानं  मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे.

कांद्याची मागणी घटली

कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्‍याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी  केली आहे .

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा