शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: June 17, 2016 02:32 IST

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले.

इंझाळा येथील घटना : मृत व जखमींमध्ये तळणी येथील युवकांचा समावेशइंझाळा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात घडली.गजानन केराम (२५) असे मृतकाचे नाव आहे. दिनेश मेश्राम (३५) व विजय भिसे (४०) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतक व जखमी हे रा. तळणी(भागवत) येथील रहिवासी आहेत.प्राप्त माहितीनुसार, इंझाळा येथून एमएच ३५ के ४१५१ क्रमांकाचा ट्रक भरधाव जात होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने तळणी येथून दुचाकीने तिघेजण येत होते. इंझाळा बसस्थानकाजवळ ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये एकजण ठार, तर दोघे जण जखमी झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केले. यानंतर घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली. वृत्तलिहेस्तोवर पोलीस घटनास्थळी पोहचलेली नव्हते. सदर ट्रक हा टॉवरच्या कामावर असून इंझाळा लगतच त्यांचे बस्ताण आहे. दररोज सायंकाळी चालक ट्रक घेऊन इंझाळा येथे मद्यप्राशन करण्यासाठी येत होता. जाताना ट्रक भरधाव नेत होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच आज हा अपघात झाल्याचेही बोलले जात आहे.(वार्ताहर)