शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची सोडत होताच राजकीय मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: August 30, 2015 02:00 IST

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने नव्याने पाडण्यात आलेल्या वॉर्डाची आरक्षणाची सोडत झाली.

सेलू नगर पंचायत : आरक्षणामुळे अनेक राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोधसेलू : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने नव्याने पाडण्यात आलेल्या वॉर्डाची आरक्षणाची सोडत झाली. आता निवडणुका लागण्याची चाहूल लागल्याने राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या आरक्षणानुसार उमेदवाराची शोध मोहीम सुरू झाली आहे.ग्रामपंचायत असताना ६ वॉर्डातून १७ उमेदवार निवडून येत होते; पण नगरपंचायतमध्ये वॉर्डाची फेररचना झाली व १७ सदस्य निवडून देण्यासाठी १७ वॉर्ड पाडण्यात आले. पहिल्यांदा होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये १७ पैकी ९ वॉर्ड महिलाकरिता राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची पंचाईत झाली आहे. गत सहा महिन्यांअगोदर ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्यात येवून प्रशासक म्हणून तहसीलदारांची नेमणूक झाली. वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने लवकरच निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. याकडे लक्ष ठेवून राजकीय नेते उमेदवाराचा शोध घेत असून जात वैधता प्रमाणपत्र बणविण्यासाठी व्यस्त आहेत. सेलू हे तालुका स्थळ असून राजकीय जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा ठेवून आहे. गत दहा वर्ष ग्रामपंचायतीवर जयस्वाल गटाची सत्ता आहे. ही निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर होईल असा कयास लावल्या जात आहे. काँग्रेसचे परंपरागत असलेले दोन गट विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आले आहे. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी या गटात मिळून नुकतीच बाजार समितीवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व भाजपा शिवसेना युती होणार काय, याकडे लक्ष लागले आहे. वर्धा उपविभागात सेलूला राजकीय महत्त्व ठेवून आहे. यामुळे येथील निवड लक्षवेधी ठरणार आहे.(तालुका प्रतिनिधी)