जुन्या तहसील कार्यालय परिसराला झुडुपांचा विळखा

By Admin | Updated: June 18, 2016 01:28 IST2016-06-18T01:28:38+5:302016-06-18T01:28:38+5:30

येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे.

The old tahsil office area was identified by the thorns | जुन्या तहसील कार्यालय परिसराला झुडुपांचा विळखा

जुन्या तहसील कार्यालय परिसराला झुडुपांचा विळखा

सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर : नागरिकांच्या जीवितास धोका
सेलू : येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. झुडपांनी त्या भागातील काही रहिवाशांच्या घराला विळखा घातला आहे. मैदानातील वाढलेल्या झुडपातील सरपटणारे प्राणी ं आसपासच्या घरात शिरतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
जुन्या तहसील कार्यालयाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. सध्या हे कार्यालय विकास चौकात भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. मात्र जुन्या तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालय व लागुनच भूमिअभिलेख कार्यालय आहे. तसेच अर्र्जेनविसांचे कामकाज येथूनच चालते. त्यामुळे नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. मैदानातील झुडपांना लागूनच तहसीलदारांचे निवासस्थान आहे. त्यांनाही सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील शिरिष देवतळे यांच्या घरी मोठा साप शिरताना नजरेत पडल्याने अनर्थ टळला.
मैदानातील व रस्त्यालगतच्या झुडपामुळे रहिवाशांची घरे झाकुन गेली आहे. या झुडपांच्या साफसफाईची जबाबदारी तहसील कार्यालय, नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणीतरी स्वीकारावी, तसेच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी याकडे लक्ष्य देत तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The old tahsil office area was identified by the thorns