शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

आता गावातच कळणार शेतकऱ्यांना मातीची क्षमता

By admin | Updated: September 30, 2016 02:30 IST

कोणत्या जमिनीमध्ये कोणते पीक घेता येईल याचेही परीक्षण करता येते, हे पूर्वी शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नव्हते.

रोजगाराची संधी : ३२ विद्यार्थी झाले माती परीक्षक वर्धा : कोणत्या जमिनीमध्ये कोणते पीक घेता येईल याचेही परीक्षण करता येते, हे पूर्वी शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नव्हते. जमिनीचा पोत, नत्र, स्पूरद या बाबी दूर होत्या. शेतकऱ्यांना काय पेरायचे व काय नाही, हे कळत नव्हते असे नव्हे; पण आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. नैसर्गिक आपत्ती व शासनाचे उदासिन धोरण यात शेती करणे जिकरीचे झाले आहे. यामुळेच आता खबरदारी घेऊन शेती करण्याची पद्धत विकसित झाली. यात ‘माती परीक्षण’ हा विषय महत्त्वपूर्ण ठरत आहे. देवळी तालुक्यातील ३२ विद्यार्थ्यांनी तत्सम प्रशिक्षण घेतल्याने आता शेतकऱ्यांना गावातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण करायचे झाल्यास कृषी विभागावर अवलंबून राहावे लागत होते. खासगीरित्या मातीचे परीक्षण करायचे म्हटले तर पैसे मोजावे लागत होते. शिवाय जिल्हा वा तालुकास्थळी येण्या-जाण्याचा खर्चही करावा लागत होता. कृषी विभागाची वर्धा येथे प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी कृषी विभागाकडून घेण्यात आलेले वा शेतकऱ्यांनी स्वत: आणून दिलेल्या मातीच्या नमूण्यांचे परीक्षण केले जाते. शिवाय त्यांच्या जमिनीमध्ये कोणते पीक घेणे योग्य राहिल, खते कशी वापरावी, फवारणी कोणती करावी आदी मार्गदर्शनही केले जाते. या बाबी आता गावातच शक्य होत असून अल्प मोबदल्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.देवळी तालुक्यातील ३२ गावांतील शेतकरी पाल्यांनी पाच दिवसीय माती परीक्षणाचे प्रशिक्षण घेऊन माती परीक्षक झाले आहेत. हे प्रशिक्षण या मुलांना युवा संस्था देवळीमार्फत कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे प्लॉस्टी सर्च इंडस्ट्रीज, भूमी प्रयोगशाळा यांनी या युवकांना प्रशिक्षित केले. हे युवक अ‍ॅग्रीकल्चर डिप्लोमा धारक आहेत. या प्रशिक्षणामुळे ३२ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीची त्यांच्याच गावात तपासणी करता येणार आहे. प्रत्येक हंगामापूर्वी मातीचे परीक्षण करणे योग्य असते. यासाठी वर्धा गाठणे वा कृषी विभागावर अवलंबून राहणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. गावातच मातीचे परीक्षण करता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळून उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)