शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निखिलची निराळी ‘कन्सेप्ट’ ठरतेय इतरांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अ‍ॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी आॅनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर चालणारी एक सायकल बधितली. त्याच क्षणी त्याने लिटिल कार तयार करण्याचे निश्चित करून पुढे प्रत्यक्ष कृतीला सुरूवात केली.

ठळक मुद्दे१५ वर्षीय बालकाचा ‘लिटिल कार’चा आविष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी असलेल्या निखिल नरेंद्र सोमनाथे याने आपल्या डोक्यातील कन्सेप्टला मूर्तरुप देऊन ‘लिटिल कार’चा यशस्वी आविष्कार केला आहे. नववीचे शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय बालकाचा आविष्कार विविध शाखेचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी पे्ररणादायी ठरत आहे.निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अ‍ॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर चालणारी एक सायकल बधितली. त्याच क्षणी त्याने लिटिल कार तयार करण्याचे निश्चित करून पुढे प्रत्यक्ष कृतीला सुरूवात केली. लिटिल कारच्या निर्मितीसाठी त्याने मेटल रॉड, लोखंडी अँगल, छोट्या मुलांची सायकल, कारचे स्टेअरिंग, प्लायवुड, शिलाई मशीनचे दोन रॉड, नटबोल्ड, लॅम्पिंग, प्रोजेक्ट लॅम्प, ई-बाईक मोटर-२४ वोल्ट आदी साहित्याचा वापर केला. सलग ३० दिवसांच्या परिश्रमाअंती लिटील कार तयार केली. त्यानंतर त्याची ट्रायल घेतली. वर्धा शहरातील रस्त्यावर धावणारी ही लिटिल कार सध्या अनेकांना भुरळ घालत आहे.लिटिल कारच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली ई-बाईक मोटर-२४ वोल्ट ही मोटार निखीलने ऑनलाईन पद्धतीचा वापर करून जापान येथून खरेदी केली.निखिलने तयार केलेली ही लिटिल कार बॅटरीसह सौरऊर्जेवरही चालत असल्याचे तो सांगतो. एकूणच १५ वर्षीय निखीलचा हा यशस्वी प्रयोग अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान