शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार

By admin | Updated: June 11, 2014 00:14 IST

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

सेलू : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.प्रत्यक्ष दुकानदाराकडून होणारी मालाची उचल आणि ग्रामस्थांना होणारा पुरवठा पाहता तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गैरप्रकाराला उधाण आले आहे. याला काही अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. मागील अनेक दिवसांपासून हा सगळा गैरकारभार येथे सुरू आहे. काही दुकानदार कारवाई अभावी अधिकारी आमच्या पाठीशी आहे, त्यांना देणी द्यावी लागते, त्यामुळे आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही, अशाप्रकारची बतावणी ग्राहकांना करीत आहे. या स्वस्त धान्य दुकानाबाबत माहवारी मालाचा पुरवठा नागरिकांना होत नसल्याने आणि सगळे नियम धाब्यावर बसवून येथे हा कारभार राजरोसपणे सुरू असल्याने अनेक गावातील ग्रामस्थ मिळणाऱ्या सोई-सवलतींपासून वंचित झाले. स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांची होणारी फरपट पाहता कारवाई गरजेची झाली आहे. मात्र त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. स्वस्त धान्य दुकानदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये होत असलेल्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे येथे हे प्रकरण या स्तरावर दडपण्याचा प्रयत्न होत आहे. अन्नसुरक्षा योजनेही येथे बराच घोळ असून गरिबांना यातून वगळण्यात आले आहे. काही श्रीमंताची नावे या यादीत असल्याने ते याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. एपीएल ग्राहकांना तीन महिन्यांपासून धान्य पुरवठा बंद आहे. हा त्या ग्राहकांवर एकप्रकारे अन्याय आहे.गावागावात राशन दुकानाच्या माध्यमातून होणारा धान्य तथा रॉकेलचा पुरवठा आणि प्रत्यक्ष त्याचा लाभ किती ग्राहकांना मिळाला यासंबंधी राशनकार्डाची तपासणी केल्यास सगळा घोळ उघडकीस येवू शकतो, असाही उल्लेख निवेदनात करण्यात आला. अनेकदा दुकानदार या महिन्याला माल मिळाला नाही, कमी मिळाला, असे सांगून ग्रामस्थांना परतवून लावतात किंवा त्यांना थोडाफार वस्तू देतात. ग्राहकांना शासन नियमानुसार आजही धान्याचे वाटप होत नसून दुकान महिन्यातून दोन-तीन दिवसच उघडल्या जाते.झडशी, कोटंबा, येळाकेळी, मोही ब्राहणी येथील दुकानाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मनोबल वाढले आहे. या सर्व बाबींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या घोटाळ्याची चौकशी करावी. त्रिसदस्यीय समिती नेमण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करुन माहवारी निकषाप्रमाणे धान्य वाटपे करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)