शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास नाही, पवनारमध्ये शेतक-यानं कापसावर धनंजय मुंडेंनाच फिरवायला लावला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:21 IST

विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला. 

वर्धा - विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला. हल्लाबोल पदयात्रेच्या सातव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवनार येथे पोहोचले. पवनार येथील शेतकरी श्रीकांत तोटे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या कापूस शेतीचे पाहणी करण्याची विनंती केली. बोंड आळीमुळे हाती आलेले पिक वाया गेले. पण शासनाने तोटे यांच्यामागे वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला असल्यामुळे दुहेरी संकट उभे राहिले होते. 

जेवढा कापूस झालेला आहे तो घेऊन जा आणि त्यातून लाईट बिल वजा करा, असे तोटे यांचे म्हणणे होते. जर असे करता येणार नसेल तर सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतः या शेतावर नांगर चालवावा, असे आर्जव तोटे यांनी केले. आम्ही नांगर चालवण्यास तयार नव्हतो. मात्र तुम्ही नांगर फिरवला नाही तरी मी हा कापूस आडवा करणार असल्याचे सांगत तोटे आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. उभ्या कापसात नांगर चालण्याचे काम दुःखद अंतकरणाने करावे लागले, अशी प्रतिक्रिया यावेळी मुंडे यांनी दिली. चित्र बघून शेतकऱ्याचे काळीज करपत आहे. आतातरी देवेंद्र फसवणीस सरकारने डोळे उघडावेत आणि कापसाला हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी. जो कापूस निघाला आहे त्याला ५०० रुपये बोनस द्यावा. अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळे