शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नाफेड सोयाबीन, मूगाची हमी भावाने करणार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:07 IST

नोंदणीस सुरुवात : आर्वीत १० ऑक्टोबरपासून खरेदी प्रारंभ होणार

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : यंदा मूग, उडीद आणि सोयाबीनची नाफेडद्वारा खरेदी होणार आहेत. यामध्ये मूग व उडदाची  १ ऑक्टोबरपासून नोंदणी, तर १० ऑक्टोबरपासून हमीभावाने प्रत्यक्ष खरेदी व सोयाबीन १५ ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे.

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या चालू हंगामात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ नाफेडद्वारा मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करणार आहेत. या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव मागितले आहेत. १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सोयाबीनची १२ जानेवारी २०२५ दरम्यान ही खरेदी होणार आहे. 

राजकीय पोळी शेकन्यासाठी वापरशेतकरी आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असेल, तर सोयाबीनला सहा ते सात हजार, कपाशीला दहा ते अकरा हजार आणि तुरीला आठ ते दहा हजार, मुगाला दहा ते बारा हजार, उडिदाला नऊ ते अकरा हजार हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाने, समाजातील कार्यकर्ते, उच्चभ्रू लोकांनी, राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. केवळ राजकीय पोळी शेकण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करू नयेत, अशी भावना शेतकरी अनुप जयसिंगपुरे यांनी व्यक्त केली. 

वर्षभरापासून दलालांकडून आर्थिक लूट वर्षभरापासून सोयाबीनला अपेक्षित असा आणि पाहिजे तसा हमीभाव मिळाला नाही. गतवर्षी खासगीत व एम-एसपीमध्ये फारसा फरक नसल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन विकले नाहीत. त्यानंतर सोयाबीनचे दर ४००० हजार रुपये क्विंटलदरम्यान स्थिरावले होते. आता मात्र तेलाचे आयात शुल्क २० टक्के केल्यानंतर सोयाबीन ४७०० ते ४९०० रुपयांपर्यंत पोहोचले. आठवड्याभरात नवे सोयाबीन बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पाडण्यात येऊन सोयाबीनचे भाव पुन्हा ४००० ते ४३०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

यंदाचे हमीभाव शेतमाल              हमीभाव प्रती क्विंटलमूग                                                  ८,६८२ उडीद                                               ७,४०० सोयाबीन                                           ४,८९२

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र