शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधव करणार क्षमायाचना

By admin | Updated: June 22, 2017 00:32 IST

रमजान महिन्यातील २६ वा रोजा गुरूवारी आहे. हा रोजा रमजान महिन्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो.

आज शब-ए-कद्र : उद्या रमजानचा अंतिम शुक्रवार मोईन शेख। लोकमत न्यूज नेटवर्क आंजी (मोठी) : रमजान महिन्यातील २६ वा रोजा गुरूवारी आहे. हा रोजा रमजान महिन्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी कुराण अवतरले होते, म्हणून रात्रीला शब-ए-कद्र म्हणतात. या रात्री जागून मुस्लीम बांधव इबादत करीत क्षमा मागतात व भविष्यासाठी दुआ करतात. २३ रोजी रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने सामूहिक नमाजमध्ये अलविदा रमजानचा संदेश देतात. ईस्लाम धर्मातील महत्त्वाचा व इबादतचा महिना म्हणजे रमजान होय. या महिन्यात ईस्लाम धर्मीय महिनाभर अन्न, पाण्याचा त्याग करून सुर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रोजा करतात. सोबतच मशीदमध्ये पाच वेळेची नमाज अदा करतात. या महिन्याची विशेष नमाज १३ व्या रात्री अदा होते. नमाजाला ईस्लाम धर्मीय आवर्जून हजर राहतात. रमजान महिन्याचे तीन पर्व असतात. पहिले १० दिवस रहमत, दुसरे १० दिवस बरकत तर तिसरे १० दिवस मगफिरतचे असतात. नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागण्याचा हा महिना आहे. या महिन्यात प्रत्येक चांगल्या कृत्याला ७० टक्के पुण्य मिळते. या महिन्यात वार्षिक उत्पन्नातून २.५ टक्के हे जकात म्हणून गरीब, गरजू लोकांना दान करण्याचा नियम आहे. गरिबांचीही ईद साजरी व्हावी, हा उद्देश आहे. २९ वा ३० दिवसांचे रोजे होताच चंद्रदर्शनानंतर दुसऱ्या दिवशी इदगाहमध्ये एकत्र येत ईदची सामूहिक नमाज अदा केली जाते. तत्पूर्वी प्रत्येक स्त्री, पुरुष, बालक, वृद्धामागे २.४५ किलो गहू फितरा म्हणून गरिबाला दान करण्याचा नियम आहे. यामुळे या ईदला ऊल-फित्र म्हणतात. हा महिना आत्मनियंत्रण, त्याग, संयम, मदत, सामाजिक सद्भावना, बंधुप्रेमाची शिकवण देतो.