शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संशयावरुन पुन्हा एका विवाहितेची हत्या

By admin | Updated: August 26, 2015 02:05 IST

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या खांडोळ्या करण्याचे प्रकरण ताजे असताना ...

धपकी येथील थरार : स्वत:च्या शेतात हत्या करणाऱ्या पतीला अटकसेलू: चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या खांडोळ्या करण्याचे प्रकरण ताजे असताना सेलू तालुक्यातील धपकी येथील एका पतीने सोमवारी दुपारी त्याच्या पत्नीची संशयावरून हत्या केली. शिवाय यातून आपली सुटका व्हावी म्हणून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सासरी जावून बसला; मात्र बयाणात असलेल्या तफावतीमुळे त्याचे बिंग फुटले.दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या घटनेतील मृतक महिलेचे नाव अर्चना चंद्रशेखर नखाते (३२) रा. धपकी असे असून मारेकऱ्याचे नाव चंद्रशेखर नखाते (३५) रा. धपकी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्रशेखर याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. त्याने स्वत:च्या मालकीच्या चारमंडळ येथील शेतात पत्नीशी वाद घालत लोखंडी पाईपने मारून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.पोलीस सुत्रानुसार, तालुक्यातील धपकी येथील चंद्रशेखर नखाते व त्याची पत्नी अर्चना यांच्यात चारित्र्याच्या कारणावरून वाद होता. अशात सोमवारी अर्चना शेतात गेली असता चंद्रशेखरही तिच्या मागावर गेला. यात शेतात दोघांत या कारणावरून वाद झाला. चंद्रशेखर याने लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर जबर वार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पळ काढणाऱ्या पतीला दहेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह अर्चनाच्या माहेरी समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रशेखरवर भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास दहेगाव (गो.) पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)हत्या करून गेला सासरीचारमंडळ येथील स्वत:च्या शेतात पत्नीची हत्या करून मारेकरी चंद्रशेखर नखाते याने थेट सासर गाठले. येथे त्याने साळ्याशी बोलणी करताना तब्बल सहा वेळा मृतक अर्चनाच्या भ्रमणध्वणीवर संपर्क केला. ती उत्तर देत नसल्याने त्याने शेजाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत त्याला विचारणा करीत शेताकडे जाण्यास सांगितले. शेतात अर्चनाचा मृतदेहच आढळून आला. अर्चनाची हत्या स्वत: केली नसल्याचा बनाव करण्याकरिता त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. बयाणातील तफावतीमुळे गुन्हा उघडचंदशेखर याने पोलिसांना दिलेल्या बयाणात तफावत आढळून येत असल्याने ही हत्या त्यानेच केल्याचा संशय उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांना आला. यावरून त्याची सखोल चौकशी केली असता ही हत्या त्यानेच केल्याचे कबुली दिल्याचे सांगण्यात आले.