शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

By admin | Updated: September 22, 2014 23:25 IST

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, यासह प्रवास व सभेचा भत्ता याची बिले अप्राप्त आहे, संपकाळातील मानधन प्रलंबित असून या मागण्यांची

वर्धा : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, यासह प्रवास व सभेचा भत्ता याची बिले अप्राप्त आहे, संपकाळातील मानधन प्रलंबित असून या मागण्यांची पुर्तता करण्यात शासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जाते. याविरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने दिली. यावेळी प्रशासनाला विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानुसार भाऊबीज भेटची तरतूद नाही, मानधन नाही आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता विजयादशमीपूर्वी न झाल्यास जि.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. आशा वर्करला केंद्र सरकारने जाहीर केलेले जानेवारी २०१४ पासूनचे एक हजार रुपये मानधन मिळाले नाही, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आदेश काढले आहे. ग्रामरोजगार सेवक, डाटा आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी, वीज वितरण विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचारी यासह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नाही. कामगार कायद्याचे उल्लंघन होत आहे आदी आरोप निवेदनातून करण्यात आले. यासह शेतकरी व शेतमजुरांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. गोवा व केरळ राज्यांत शेतकरी व शेतमजुरांना पेंशन दिली जाते. राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेंशन दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. मोलकरणी व इमारत बांधकाम कामगारांच्या हितासाठीच्या फसव्या जाहिराती केल्या जात असल्याचा आरोप करुन मोर्चात निदर्शने देण्यात आली. यावेळी आयटकच्या हसीना गोरडे, विजया पावडे, मैना उईके, वंदना काळसकर, सुजाता शंभरकर, रेखा काचोळे, रेखा कोठेकर, प्रा. राजू गोरडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. या निवेदनाची दखल घेत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)