शाळेतही माकडांचा धुमाकूळ...

By Admin | Updated: September 28, 2016 01:56 IST2016-09-28T01:56:17+5:302016-09-28T01:56:17+5:30

सध्या जिल्ह्यात माकडांच्या कळपांनी शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे.

Monkeys in school ... | शाळेतही माकडांचा धुमाकूळ...

शाळेतही माकडांचा धुमाकूळ...

शाळेतही माकडांचा धुमाकूळ... सध्या जिल्ह्यात माकडांच्या कळपांनी शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. ग्रामीण भागासह शहरांतही माकडांचे कळप नासधुस करताना दिसून येतात. हमदापूर येथे मात्र माकडांकडून शाळेतील विविध वस्तुंवरच कब्जा केला जात असल्याचे दिसून येते. हमदापूर येथील यशवंत विद्यालयाच्या परिसरामध्ये सोमवारी माकडांनी असा उच्छाद मांडला होता. शाळेतील पाण्याच्या टाकीवर तसेच दुचाकी वाहनांवर माकडांनी ठिय्या मांडला होता. परिमाणी, विद्यार्थ्यांना प्रांगणामध्ये खेळणे, बागडणेही कठीण झाले आहे. या माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Monkeys in school ...