शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीनंतर आता नागरिकांना महागाईची मार सहन करावा लागत आहे. धान्यासोबतच, जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा भडका उडाल्याने दैनंदिन जीवनाचे अर्थचक्रच कोलमडले आहे. अशा परिस्थिती शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे मिळणाऱ्या माफक दरातील आणि मोफत धान्याचा मोठा आधार मिळत आहे.जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. लाभार्थी अतिरिक्त धान्याची विक्री करून इतर धान्य किंवा वस्तू विकत घेत असल्याचे गावापासून तर शहरापर्यंतचे चित्र आहे. शासनाकडून मिळणारे गहू, तांदूळ आणि साखरेची किंमत  खुल्या बाजारात दुप्पट ते चौपट असल्याने या महागाईत कधी धान्याची उचल न करणारेही नियमित उचल करायला लागल्याचे चित्र आहे. 

नोव्हेंबरपर्यंत मोफत धांन्य योजनेचा लाभकोरोनाकाळात रोजगार हिरावल्याने धान्य कोंडी होऊन उपासमारीचा सामना करावा लागू नयेत, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफत धान्य देण्याला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाच किलो तांदूळ दिले जायचे. त्यानंतर तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ द्यायला सुरुवात केली. अजूनही हे माफत धान्य वितरण सुरूच असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा वाटप राहणार आहे. या योजनेतून जिल्ह्याकरिता दरमहा ५ हजार ४७२ मेट्रिक टन धान्य उपलब्ध होत आहे. यामध्ये ३ हजार २५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार २३२ मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण २ लाख ७९ हजार ९७४ कार्डधारक असून लाभार्थ्यांची संख्या ११ लाख ३१ हजार ९६५ आहेत. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे नियमित धान्य पुरवठा केला जातो. याकरिता दरमहा ६ हजार ५०८ मेट्रिक टन धान्य लागते. सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून ५ हजार ५८२ मेट्रिक टन धान्य दिले जाते. ऑगस्ट महिन्याचे आजपर्यंत ८० टक्के धान्य वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही धान्य वाटप सुरु असून त्यांनी दुकानातून धान्याची उचल करावी. - रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या