शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

‘६०:४०’ च्या गुणोत्तरात अडकली मनरेगा

By admin | Updated: August 14, 2015 02:24 IST

ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळावे, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली.

आष्टी (श.) : ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळावे, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. प्रारंभी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गत वर्षभरापासून प्रशासनाने हात वर केल्याने ही योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. आष्टी पंचायत समिती अंतर्गत ४२ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात एकूण ६९ गावांत मनरेगाच्या पांदण खडीकरण, मातीकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, वृक्षलागवड, सिंचन विहीर बांधकाम दिलेल्या विहित कालावधीत पूर्ण करण्यात आले. कार्यारंभ आदेश व शेड्यूल बी प्रमाणे कंत्राटदार आणि शेतकऱ्यांनी कामे केली. यानंतर मोजमाप पुस्तिका तयार करून बिल पंचायत समितीमध्ये पाठविण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून संगणक प्रणाली विभागाकडे देयकांचे प्रस्ताव सादर केलेत. या विभागाचा कारभार विभागीय महसूल आयुक्त नागपूर कार्यालयातून चालतो. तेथील कर्मचाऱ्यांनी ‘६०:४० चा रेशो’ असे सॉफ्टवेअर असल्याच्या सूचना देऊन तुर्तास बिल निघणार नाही, असे सांगून जबाबदारी झटकली. मार्च २०१५ च्या पूर्वीचे २४ लाख रुपये तर १ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंतच्या ५१ लाख रुपयांची देयके थंडबस्त्यात पडली आहेत. याबाबत कर्जबाजारी झालेल्या शेतकरी व कंत्राटदारांनी वारंवार लेखी तक्रारी केल्या; पण त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. याबाबत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली; पण त्यांनीही कुणाचेही मत ऐकून न घेताच देयके निघतील, एवढेच सांगितले. जि.प. प्रशासनाला तालुक्याच्या कारभारावर लक्ष द्यायला वेळ नाही. शेकडो रोजगार सेवक तथा योजनेवर विसंबून असलेल्या कामगार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. व्याजाने पैसे काढून काम केले आणि हक्काचे पैसे मिळत नसल्याने काम केले हाच गुन्हा झाला, शासनाने आत्महत्या करण्याची वेळ आणली, अशा प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करताहेत. १५ दिवसांत पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी, कंत्राटदारांनी निवेदनातून दिला आहे.(प्रतिनिधी)