शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरतील मिनी मंत्रालयाचे शिलेदार

By admin | Updated: February 23, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले.

यंत्रणा सज्ज : ८४७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला वर्धा : जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले. तेव्हापासून सर्वांनाच निकालाची उत्सूकता लागली होती. ही उत्सूकता काही तास ताणली जाणार आहे. गुरूवारी मतमोजणी होत असून मिनी मंत्रालयाचा शिलेदार कोण, हे ठरणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून कर्मचारीही तैनात केले आहेत. जिल्ह्यात आठही तालुक्यात सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ३३९ मतदारांची नोंद आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १६ फेबु्रवारी रोजी ४ लाख ९२ हजार २९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यात २ लाख ६३ हजार ७६७ पुरूष तर २ लाख २८ हजार ५२८ स्त्री मतदारांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील दोन गट व चार गणासाठी मतदान झाले. यात एकूण मतदार २७ हजार १९९ होते. यापैकी १९ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. यात १० हजार ३४५ पुरूष तर ८ हजार ९१६ महिला मतदारांचा समावेश होता. ५२ जि.प. गट व १०४ पं.स. गणाकरिता ८४७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरूवारी होणार आहे. मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. १३० टेबलवरून मतमोजणी केली जाणार असून सुमारे ९०० अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आहेत. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आष्टी, कारंजा, समुद्रपूर, देवळी आणि हिंगणघाट येथील मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. आर्वी येथील मतमोजणी गांधी विद्यालयात, सेलू येथे दिपचंद चौधरी विद्यालय तर वर्धा येथील मतमोजणी जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात येणार आहे. यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त मतमोजणी शांततेत पार पडावी, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील आठही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक, ४३५ पोलीस कर्मचारी, एसआरपीची एक कंपनी आणि राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १३० टेबलवरून मतमोजणी मतमोजणीसाठी वर्धेत क्रीडा संकुलावर व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्धेत २८ टेबलवर मोजणी होणार असून १ ते १४ टेबलवर जि.प. गटांची तर १५ ते २८ टेबलवर पं.स. गणाची मोजणी होईल. सेलू येथे १८ टेबल, देवळी, समुद्रपूर व कारंजा येथे प्रत्येकी १२ टेबल, हिंगणघाट येथे २१, आष्टी ९ तर आर्वी येथे १८ टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे.