अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; अल्लीपूर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या
By चैतन्य जोशी | Updated: September 13, 2022 18:28 IST2022-09-13T18:22:52+5:302022-09-13T18:28:04+5:30
पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती ९ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; अल्लीपूर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या
वर्धा : अल्पवयीन मुलीचे शोषण करुन तिला नऊ आठवड्यांची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार अल्लीपूर गावात उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी १२ रोजी रात्री उशिरा आरोपीस अटक केल्याची माहिती दिली. बजरंग श्रावण परचाके (१८) रा. अल्लीपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडितेची आणि आरोपीची सोशल मीडिया साईट्सवरुन ओळख झाली. दोघेही एकमेकांसोबत इन्स्टाग्रामवर बोलू लागले. ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन आरोपी बजरंग याने तिला स्वत:च्या घरी बोलावून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती ९ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अखेर याप्रकरणात अल्लीपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.