शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेच्या संवर्धनातच मनुष्याचे स्वार्थ, कल्याण

By admin | Updated: February 1, 2015 23:03 IST

पारंपरिक ज्ञानाचा समन्वय आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन करणे अनिवार्य झाले आहे. जैविविधतेचे व्यवस्थापन ही एक सातत्याने

वर्धा : पारंपरिक ज्ञानाचा समन्वय आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन करणे अनिवार्य झाले आहे. जैविविधतेचे व्यवस्थापन ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे़ त्यातच मनुष्यमात्राचे स्वार्थ आणि कल्याण दडलेले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंह यांनी केले. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी ग्रामविकास तंत्रनिकेतन पिपरी येथे जैवविविधता अधिनियम २००२ या कायद्यान्वये ‘नैसर्गिक संसाधानांवर गावकऱ्यांना सामूहिक अधिकार मिळवून देण्यात स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी ते बोलत होते़ भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या जैवविविधता अधिनियम २००२ च्या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायत व नगर परिषदांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धन आणि उपयोगाचा अधिकार हा कायदा देतो. म्हणून सर्व गावकऱ्यांना या अधिनियमाची माहिती देऊन त्यांना त्यांच्या गावात जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यास ठी प्रेरित करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांनी करावी, असे आवाहनही डॉ. दिलीप सिंह यांनी केले. वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी होण्यासाठी ग्रामीण भागात सुधारित चुली आणि शहरी भागात सूर्यकुकरचा वापर वाढविण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले़ राज्य जैवविविधता मंडळाचे सल्लागार डॉ. दिलीप गुजर यांनी जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबद्दल विस्ताराने माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा जैवविविधता समितीचे सचिव आणि उपवनसंरक्षक गणात्रा यांनी जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षा मंडळाच्या शैक्षणिक संस्थांप्रमाणे अन्य शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, शिक्षा मंडळ संचालित सर्व महा़चे प्राचार्य, प्राध्यापक, कृषी समृद्धी योजनेचे समन्वयक संजय सोनटक्के, ‘आत्मा’च्या शीतल मानकर, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन अतुल शर्मा, आशिष चव्हाण यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)