शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माधवची आत्महत्या नसून हत्याच

By admin | Updated: May 24, 2014 00:06 IST

नजीकच्या पारडी येथील माधव कंगाले यांचा मृतदेह परिसरातील संत्र्याच्या झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आला होता. पोलिसांनी तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

वर्धा: नजीकच्या पारडी येथील माधव कंगाले यांचा मृतदेह परिसरातील संत्र्याच्या झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आला होता. पोलिसांनी तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र तपासात माधवने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केल्याची गंभीर बाब तपासात समोर आली. या प्रकरणी मृतकाचा मुलगा सुभाष कंगाले व त्याचा शेजारी विलास पेंदाम याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, रविवार १८ मे रोजी तळेगाव(श्या.) नजीकच्या पारडी येथील माधव कंगालेचा मृतदेह गावाजवळ असलेल्या संत्र्याच्या झाडाला टांगून होता. त्याच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवचिच्छेदनाकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविला. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपास केला असता मृतकाच्या डोक्यावर गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. यावरून पोलिसांनी तपासाची सुत्रे हलविली असता माधव कंगाले यांचा शेजारी राहत असलेल्या विलास पेंदाम याच्याशी वाद झाला. या वादात विलास याने माधवराव याला मारहाण केली. यात माधव जखमी होताच त्याने आणखी शिवीगाळ करणे सुरू केली. त्याची शिवीगाळ ऐकूण त्याचा मुलगा सुभाष कंगाले याने माधव याला पुन्हा मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. रात्री माधवची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू होईल व आपल्यावर हत्येचा गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी या माधवचा मृतदेह संत्र्याच्या झाडाला टांगल्याची कबुली या दोघांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष कंगाले व विलास पेंदाम या दोघांना अटक केली. ही कारवाई एसडीओ बुरडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्यासह त्यांच्या चमूने केली. (प्रतिनिधी)