शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करा

By admin | Updated: April 21, 2016 02:30 IST

‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण ....

माथा ते पायथा जलशिवार योजना : पाच गावातील गावकऱ्यांची शासनाकडे मागणीकारंजा : ‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे. खोलीकरण झाल्यास ड्रायझोनमध्ये असलेल्या ठाणेगाव, चंदेवाणी, मदनी, सेलगाव, बिहाडी या पाच गावातील दुष्काळ मिटू शकतो. त्यामुळे माथा ते पायथा योजनेंतर्गत सदर गाव करावे अशी मागणी राज्य शासनाकडे या पाचही गावातील नागरिकांनी ठरावानिशी केली आहे.कारंजा तालुक्यातील चंदेवाणी, मदनी, ठाणेगाव, सेलगाव (लवणे), बिहाडी ही गावे ड्रायझोनमध्ये असून येथे कायमस्वरूपी दुष्काळ असतो. पिण्याच्या पाण्यासोबतच गुराढोरांना चारा व पाणी हा प्रश्नही या गावांला तिव्रतेने जाणवतो. ही गावे उंचावर असल्यामुळे खैरी धरणाचे पाणी या गावांना मिळू शकत नाही. त्यामुळे या गावांचा विकास खोळंबला आहे. येथील पाणीपातळी खूप खोल गेली आहे. खडकाळ भूभाग असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही.हेटीकुंडी तलावापासून कार (खैरी) प्रकल्पापर्यंत अंदाजे नऊ कि़मी. परिसरात अंबा नदी वाहते. अर्ध्या हिवाळ्यापर्यंत या नदीला पाणी असते. पण नदीची रूंदी व खोली कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी बाजूच्या शेतात पसरून शेतीचे व पिकांचे नुकसान होत.‘माथा ते पायथा जलशिवार योजनेंतर्गत’ या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास तसेच नदीपात्रात बॅरेजेस, लहान तलाव व बंधारे निर्माण केल्यास पाण्याची साठवणूक होवून पाचही गावांची पाणीसमस्या कायमस्वरूपी दूर होवू शकते.तसेच या नदीतून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर कोल्हापुरी बंधारे आणि उंच पूल बांधल्यास पाण्याचा साठा वाढून सभोवतालच्या विहिरींच्या पाण्याची पातळीहई वाढू शकते. त्यामुळे जून २०१६ पूर्वी हे काम शासनामार्फत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाला जवळपास ६ ते ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण योजना राबविल्यास या पाच गावातील जलसमस्या कायमची संपेल, असे तज्ज्ञ जानकारांचे मत आहे.योजनेचे महत्व व उपयोगीता लक्षात घेवून सेलगावचे सरपंच हनुमंत पठाडे, बिहाडीचे सरपंच कोकाटे, चंदेवाणीचे उपसरपंच अजय इंगळे, मदनीचे प्रदीप शेटे, बिहाडीचे विनोद धांदे, ठाणेगावचे सरपंच बोरकर, उपसरपंच साहेबराव पांडे, चंदेवाणीचे सरपंच कांबळे यांनी ग्रा.पं. स्तरावर ठराव घेवून लेखी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)