शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा पिकावर घाटेअळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरिपात अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन ओले झाल्याने अंकुरले. तर कापूसही भिजल्याने कवडीमोल भावात विकावा लागला.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : खरीपापाठोपाठ रबी हंगामही आला धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ढगाळ वातावरण, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे जिल्ह्यातील शेतशिवारात हरभरा पिकावर घाटेअळ्यांनी हल्ला चढविला आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.खरिपात अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन ओले झाल्याने अंकुरले. तर कापूसही भिजल्याने कवडीमोल भावात विकावा लागला. सोयाबीनचे दाणे ओले झाल्याने कित्येक शेतकऱ्यांना फारसा भाव मिळाला नाही. नैसर्गिक संकटांमुळे दरवर्षी दसऱ्याला घरात येणारा कापूस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप शेतात आहे. त्यामुळे शेतशिवार शुभ्रच आहे. खरीप हंगामावर शेतकरी वार्षिक नियोजन करतो. मात्र, त्याचे हे नियोजन पूर्णत: कोलमडले. खरीप हंगाम शेतकºयांना लाभला नाही. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. रब्बी हंगामावर शेतकऱ्याची भिस्त होती. या हंगामातील हरभरा पीक घाट्यांवर असताना ढगाळ वातावरणामुळे घाटेअळीने हल्ला चढविल्याने पिकांची अक्षरश: चाळण झाली आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळ्यांचा प्रकोप कमी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट येणार असल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. मात्र, कृषी विभागाकडून शेतकºयांना प्रभावी उपाययोजना सुचविल्या जात नाहीत. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील हरभरा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसाने गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे पीक अक्षरश: जमिनीवर लोळले. खरीप हंगाम अवकाळी आणि परतीच्या पावसाने हातून गेला. या हंगामापाठोपाठ रब्बीतही पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरून गेला आहे. मुलांचे शिक्षण, लग्नसोहळे कसे करावे, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्याकरिता कृषी विभागाला कळविले; मात्र शासकीय यंत्रणा शेतकºयांच्या बांधावर पोहोचली नाही. जिल्हाधिकाºयांनी नुकसानाचे सर्वेक्षण तातडीने करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.पावसामुळे खारही होतोय नष्टचीकणी शेतशिवारात यंदा मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली; मात्र वेळोवेळी अवकाळी पाऊस येत असून सातत्याने ढगाळी वातावरणाची छाया आहे. परिणामी पिकावर घाटी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच पावसामुळे हरभऱ्याच्या झाडांवरील खार नष्ट होत असल्याने घाटी भरत नाहीत. यामुळे हरभरा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याचा अंदाज येथील वयोवृद्ध शेतकरी वर्तवित आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी