शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपट ‘निर्धार’मध्ये झळकणार स्थानिक कलावंत

By admin | Updated: July 19, 2015 02:13 IST

विदर्भ मोशन्स पिक्चर निर्मित, सचिन उराडे दिग्दर्शीत ‘निर्धार’ या मराठी व्यावसायिक चित्रपटाचा मुहूर्त वाघोली येथे पार पडला.

वाघोली येथे झाला चित्रपटाचा मुहूर्त : ग्रामीण समस्येवर आधारित चित्रपटात तपासे होणार ‘पाटील’हिंगणघाट : विदर्भ मोशन्स पिक्चर निर्मित, सचिन उराडे दिग्दर्शीत ‘निर्धार’ या मराठी व्यावसायिक चित्रपटाचा मुहूर्त वाघोली येथे पार पडला. या चित्रपटात हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे संचालक संजय तपासे हे पाटलाची मुख्य भूमिका साकारणार आहेत. यापूर्वीही एका मराठी चित्रपटात येथील कलावंताची वर्णी लागली होती. यामुळे हिंगणघाट शहराचाही मराठी चित्रपटसृष्टीत लौकिक होतोय.हिंगणघाट परिसरात एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे उल्लेखनीय! या चित्रपटाचा मुहूर्त वाघोली या गावात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणजीत कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजू तिमांडे, कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, पं.स. सभापती संजय तपासे, उपसभापती मिलिंद कोपुलवार, जि.प. सदस्य प्रा. उषाकिरण थुटे, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, अनिल भोंगाडे, प्राचार्य भाष्कर आंबटकर, दिग्दर्शक सचिन उराडे आदी उपस्थित होते. चित्रपटाबाबत माहिती देताना दिग्दर्शक उराडे म्हणाले की, ‘निर्धार’ हा ग्रामीण भागातील ज्वलंत समस्येवर आधारित चित्रपट आहे. चित्रीकरण वाघोलीसह हिंगणघाट परिसरात होणार आहे. चिखलदरा, महाकाळी, ताडोबा परिसरात या चित्रपटातील गीतांचे चित्रीकरण होणार आहे. स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात संधी मिळणार आहे. वाघोली या गावी चित्रपटाचे अधिक चित्रीकरण होणार आहे. यात पं.स. सभापती संजय तपासे हे ‘पाटील’च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे ग्रामीण जीवनावर व समस्यांवर आधारित असून त्यास पे्रक्षकांकडून प्रतिसाद मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.आ. कांबळे यांनी हिंगणघाट परिसरातील ग्रामीण भागात या चित्रपटाची निर्मिती अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. यावेळी सोमदल करंजेकर, प्रा. सुनील खेमदेव, सरपंच जयश्री वरघणे, अविनाश ढगे, मुजबैले, राऊत, धोटे, शीला महाकाळकर, रामू वासेकर, मंदा भट, आशा जवादे, अनिल भोयर, प्रवीण काळे, मंगला गौळकार, अंकुश दुरूगवार, बापू इटनकर, गुंफा दुरूगवार, वसंत नौकरकर आदी हजर होते. प्रास्ताविक प्रवीण खूणकर तर संचालन गोपाल बाळबुधे यांनी केले. आभार राहुल बागुल यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)चित्रपटात झळकणारा दुसरा कलावंतपंचायत समिती सभापती संजय तपासे हे हिंगणघाट येथील चित्रपटात झळकणारे दुसरे कलावंत ठरणार आहे. यापूर्वी ‘गोट्याची कमाल, सोट्याची धमाल’ या चित्रपटातही हिंगणघाट येथील एक कलावंत चमकला आहे. यातही येथील कलावंताने विनोदी पात्र रंगविले आहे. आता हिंगणघाट व ग्रामीण भागात चित्रित होणाऱ्या ‘निर्धार’ या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटात गावातील ‘पाटील’ ही मुख्य भूमिका हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती आणि बाजार समितीचे संचालक संजय तपासे वठविणार आहेत. शिवाय हिंगणघाट परिसरातील ग्रामीण भागात चित्रीकरण होणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. यामुळेही हिंगणघाटला चित्रपटसृष्टीचे वेगळे वलय मिळणार असल्याचेच दिसते.