मंगरूळात शाळेसमोरच चालते दारूचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:31 PM2018-07-18T22:31:54+5:302018-07-18T22:32:11+5:30

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.

The liquor shop runs in front of the school in Mangalore | मंगरूळात शाळेसमोरच चालते दारूचे दुकान

मंगरूळात शाळेसमोरच चालते दारूचे दुकान

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.
मंगरूळ गावामध्ये बाहेरगावावरून लोक दारू प्यायला येतात दारू पिलेले मुजोर लोक शाळा महाविद्यालयातील मुलींशी चिडीमारी करतात सदर मद्यधुंद लोकांचा व दारूविक्रेत्यांमुळे गावातील मुली व महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. व तरूण व विद्यार्थी हा व्यसनाच्या आहारी जात आहे. वारंवार स्थानिक पोलीस अधिकाºयांच्या भेटी घेऊन त्यांना माहिती दिली तरीही दारू विक्री सर्रास सुरू आहे, असे नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.
निवेदन देताना मंगरूळ येथील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्कल प्रमुख किशोर तांदुळकर, तालुका उपाध्यक्ष संदीप झाडे, पोलीस पाटील अरविंद जोगवे, सरपंच सविता कुकडे, तंटामुक्त अध्यक्ष शेख इस्माईल, ग्रामपंचायत सदस्य संजू तुराळे, सचिन कुबडे, रंजना देशमुख, व्ही.बी.व्ही.पी. जिल्हा अध्यक्ष नीरज बुटे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष योगिता इंगळे, वंदना गावंडे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मयूर फडळे, अमर देशमुख, अ‍ॅड. कपिल गोडघाटे शुभांग मून, सुधा ढोणे, रंजना कुबडे, देविदास तिजारे, सचिन ढोणे, दीपक कुबडे, सागर पाल, अरविंद झाडे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी निवेदन देतांना म्हटले आहे.

पोलिसांचे अभय कुणाला? गावकºयांना की दारू विक्रेत्याला
मंगरूळ हे गिरड पोलिस ठाण्यातंर्गत येणारे गाव आहे. या ठाण्यातंर्गत दारूबंदीच्या अंमलबजावणीचे अधिकार पोलिसांना आहे. असे असताना शाळा व महाविद्यालयासमोर दुकान लावून दारूविक्री करण्याची हिंमत विक्रेत्याकडे आली कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक या प्रकारामुळे संतप्त असून यात मोठे अर्थकारण कारणीभूत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

Web Title: The liquor shop runs in front of the school in Mangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.