शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना दाखला तालुकास्थळीच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:31 IST

सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते.

ठळक मुद्देयुवा संघर्ष संघटनेची मागणी : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. जिल्ह्यातील विविध गावातून दिव्यांगांना जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धेत येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची समस्या लक्षात घेता दिव्यांग बांधवांना तालुक्याच्या स्थळीच सदर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युवा संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर करण्यात आले आहे.सेलू तालुक्याच्या ठिकाणाहून वर्धा येथे जाण्यासाठी दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तिथे जाऊन ही काम झाले तर ठीक नाही तर रिकाम्या हाती परतावे लागते. या त्रासाला कंटाळून अनेक दिव्यांग या प्रमाणपत्र पासून अजूनही वंचित आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे मानधनही अनेक दिव्यांगांना मिळत नाही. परिणामी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी युवा संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना शुभम लुंगे, सुनील घंगारे, दीपक घुमडे, नितीन गुजर, आरिफ झिरिया, किशोर बावणे, गुड्डू गुजर, समीर डाखोळे, प्रदीप धानकुटे, कुणाल चोरे, सुरज खोडके, मयुर चोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.