शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम दिवस : आज दिग्गजांची उमेदवारी - ४१ नामांकन

By admin | Updated: September 27, 2014 02:02 IST

आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

वर्धा : आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. शुक्रवारी चारही विधानसभा क्षेत्रात एकूण २५ जणांनी नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारपर्यंत चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ४१ नामांकन दाखल झाले आहे. हिंगणघाटात शिवसेनेकडून अशोक शिंदे, राष्ट्रवादीकडून राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, वर्धेत राष्ट्रवादीकडून सुरेश देशमुख, आर्वी काँग्रेसकडून अमर काळे, देवळीत भाजपाकडून सुरेश वाघमारे या दिग्गजांना आपले नामांकन दाखल दाखल केले आहेत. नामांकन दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उर्वरित दिग्गज उमेदवारी दाखल करणार असून शक्तिप्रदर्शनही बघायला मिळणार आहे. हिंगणघाट विधानसभाक्षेत्रातून पाच जणांनी ११ उमेदवारी अर्ज विकत घेतले. आतापर्यंत आठ जणांनी १६ अर्जांची खरेदी केली. देवळी विधानसभा क्षेत्रात भाजपकडून दोन नामांकन दाखल झाले आहे. यात भाजपच्या दिनेश शिरभाते यांचाही समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रात आज एकूण ११ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत येथे एकूण १४ नामांकन दाखल झाले आहे.आर्वीत आर्वीत आतापर्यंत सात नामांकन दाखल झाले आहे. तर ९३ अर्जांचंी विक्री झाली आहे. या मतदार संघात भाजपाचा उमेदवार जरी निश्चित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम कायम आहे. कोणाच्या पदरात उमेदवारी पडते, याकडे राकाँ व सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.वर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय हेडाऊ, डाव्या लोकशाहीतर्फे स्कर्मिश खडसे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे किशोर किनकर यांनी नामांकन दाखल केले. भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. विधानसभा निवडणूक जाहीर झाली, त्या काळापासून सुरू असलेल्या युती व आघाडीच्या जागावाटपाचा तिढा गुरुवारी घटस्फोटाने सुटला. हा वाद सुरू असताना आता नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आली. शेवटच्या दिवशी कितीजण आपले नामांकन दाखल करते, याकडे आता लक्ष लागले आहे. कोण बंडखोरी करतो काय, याकडेही लक्ष लागले आहेत.(प्रतिनिधी)