शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामापूर्वीच शेतकऱ्यांना भूखंड

By admin | Updated: October 4, 2016 01:51 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने

राधेश्याम मोपलवार : महामार्गामुळे एक लाख रोजगाराची संधी वर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने भूसंचयन करणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील भूखंडाचे हक्क दिल्यानंतरच महामार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. महामार्गाचे काम आणि कृषी समृद्धी केंद्रातील मुलभूत सुविधांची कामे सोबत-सोबत करण्यात येतील. त्यामुळे रस्ता तयार होईपर्यंत कृषी समृद्धी केंद्र उद्योग येण्यासाठी पूर्णपणे तयार झाले असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गासंबंधी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मोपलवार बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी जी.एच. भूगावकर, प्रकाश शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे यु.व्ही.डाबे, भूसंपादन अधिकारी सुके, तहसीलदार व तलाठी उपस्थित होेते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ते थेट मुंबई-गुजरात पर्यंत जलद प्रवासाठी सहा पदरी महामार्ग आहेत. पुणे-मुंबई तसेच नाशिक-मुंबई रस्ते सुद्धा महामार्ग आहेत. त्यामुळे तेथील कच्चा माल तत्काळ मुंबईला पाठविण्यात येतो. तसेच तेथील उद्योगांनाही यामुळे जलद माल पाठविता येतो. पण विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यामध्ये तत्काळ मुंबईला नाशिवंत वस्तु पाठविण्यासाठी ३६ तास लागतात. ज्या-ज्या शहराच्या बाजूला महामार्ग आहेत तिथे रस्त्याच्या बाजुला उद्योग, व्यवसाय सुरू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे पुढील १० वर्षात या भागात १ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात जात नाही ते शेतकरी रस्त्याच्या बाजूला उद्योग, व्यवसाय सुरू करतात, आणि ज्यांची जमीन प्रकल्पामध्ये गेली ते उध्वस्त होतात. प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मिळावा म्हणून भूसंचयन संकल्पना राबविण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) व्यवसायाकरिता बँकांची मदत ४वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जगाला तत्वज्ञान देणारा सर्वोत्तम जिल्हा तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. वर्धेसाठी नाट्यगृह, अत्याधुनिक बसस्थानक, देवळीला स्टेडीयम तसेच लोअर वर्धा २०१७ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी देण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्याचे आवाहन या सरकारने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.