शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भूमी संचयनासह भूमिअधिग्रहणाचाही पर्याय

By admin | Updated: September 23, 2016 02:24 IST

नागपूर-मुंबई हा निव्वळ समृद्धी मार्ग नव्हे, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तो कृषी समृद्धी मार्ग होय.

रामदास तडस यांची माहिती : नागपूर-मुंबई हा विदर्भासाठी कृषी समृद्धी मार्गवर्धा : नागपूर-मुंबई हा निव्वळ समृद्धी मार्ग नव्हे, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तो कृषी समृद्धी मार्ग होय. शेतकऱ्यांना भूसंचयनाच्या माध्यामातून मोबदला मिळणार असला तरी ज्या शेतकऱ्यांना भूमीसंचय करायचे नाही, अशा शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण कायद्यांतर्गत रेडीरेकनरच्या जास्तीत जास्त दरानुसार पावणे चार पट रक्कम घेता येणार आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. असा प्रसार केला जात आहे. वास्तविक, हा मार्ग विदर्भातील शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जावा. त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी. देशातील दळणवळण विदर्भाशी जोडली जावी, विदर्भ विकासाला चालना मिळावी, असे अनेक महत्त्वाचे हेतू समोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ड्रिम प्रोजेक्ट तयार केला आहे. यामुळे या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांचाही भूमीसंचयनाच्या माध्यमातून विचार केला आहे. ज्या शेतकऱ्यांना भूमीसंचयन करायचे नाही, अशा शेतकऱ्यांना भूमीअधिग्रहण कायद्यानुसार आपली शेती देता देणारा आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पावणे चार पट रक्कम मोबदला मिळणार आहे, असेही खा. तडस यावेळी म्हणाले. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यातील ३५ गावांमधून हा कृषी समृद्धी मार्ग जाणार आहे. सेलू तालुक्यात जमिनीचे रेडीरेकनर दर किमान दर हेक्टरी ३ लाख ५७ हजार रुपये इतके तर कमाल हेक्टरी दर १३ लाख रुपये इतके आहे. वर्धा तालुक्यात किमान दर ४ लाख ७२ हजार ५००, तर कमाल दर ९ लाख ७१ हजार २५० इतके आहे. आर्वी तालुक्यात किमान दर २ लाख ३७ हजार ६०० तर कमाल दर ७ लाख ३९ हजार ८०० रुपये इतका आहे. यानुसार शेतकऱ्यांना चार पट मोबदला मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांना निम्मी शेती भूसंचयन आणि निम्म्या शेतीचा पूर्ण मोबदला घ्यायचा आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे गेलेला आहे, असेही खा. तडस म्हणाले.या मार्गावर वर्धा जिल्ह्यात चिचघाट ता. सेलू, गणेशपूर ता. वर्धा व बोरी विरुळ ता. आर्वी अशा तीन ठिकाणी वसाहती स्थापन करण्यात येणार आहे. तेथे लागणाऱ्या जमिनीसाठीसुद्धा याच पद्धतीने मोबदला दिला जाणार आहे. २०१९ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भासोबतच महाराष्ट्राचा विकास हा विकास राज्य शासाने स्पष्ट केला असल्याची माहितीही खा. तडस यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)