सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:04+5:30

विलास गोविंद करंडे (५६) रा. सराफा लाईन यांचे सराफा बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरज बंडू पाटील रा. दयालनगर याला दुकानासमोर लावलेली हातगाडी हटविण्यास सांगितले. सुरज पाटील याने वाद करीत हातगाडी हटविण्यास नकार देत विलास करंडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान याबाबतची तक्रार विलास करंडे यांनी पोलिसात दिली.

Knife attack on the businessman | सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला

सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला

Next
ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : हल्ल्याच्या निषेधार्थ सराफा प्रतिष्ठाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुकानासमोरील हातगाडी काढण्यास सांगितले असता हातगाडीचालकाने सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
विलास गोविंद करंडे (५६) रा. सराफा लाईन यांचे सराफा बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरज बंडू पाटील रा. दयालनगर याला दुकानासमोर लावलेली हातगाडी हटविण्यास सांगितले. सुरज पाटील याने वाद करीत हातगाडी हटविण्यास नकार देत विलास करंडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान याबाबतची तक्रार विलास करंडे यांनी पोलिसात दिली. पोलिसात तक्रार का दिली या कारणावरुन पुन्हा वाद करीत सुरज पाटील आणि वैभव पाटील यांनी विलास करंडे त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यात विलास करंडे यांच्या हाताला जखम झाली. पोलिसांनी सुरज पाटील आणि वैभव पाटील यांना अटक केली.


सराफा ओळीला पोलीस छावणीचे स्वरूप
सराफा व्यावसायिक विलास करंडे यांचा हातगाडीचालक सुरज पाटील याच्याशी वाद झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी गोल बाजार चौकातील सर्व फेरीवाल्यांना हुसकावून लावले. रात्री ९ वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. पण, पोलीस जाताच विलास करंडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ दुपारपर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर यांनी सराफ लाईनमध्ये जाऊन पाहणी केली असता येथील हातगाडीचालकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी विलास करंडे, शालिग्राम टिबडीवाल, प्रवीण हिवरे, वैभव घडे, देविदास करंडे यांनी केली.

पाच हातगाडीचालकांवर कारवाई
पोलिसांनी गोलबाजार परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शेख सलीम शेख कादर रा. पुलफैल, सुरज अविनाश पाटील रा. दयाल नगर, विनोद मारोतराव वानखेडे रा. सेवाग्राम, देविदास पाटील रा. पुलफैल आणि कमलेश चकोले रा. रामनगर या पाच हातगाडीचालकांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले.

Web Title: Knife attack on the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.