शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३ लाख ११ हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता.

ठळक मुद्देकृषी विभाग : ४ लाख २८ हजार क्षेत्रावर होते नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तब्बल ३ लाख ११ हजार ८६५ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते, सरासरी एकूण ७०.४३ टक्के पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकांनी दिली.जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता. जवळ पै-पैसा नसताना उसनवारी आणि पीककर्ज काढून कपाशी, तूर, सोयाबीन आदीची शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोवळ्या रोपांनी उष्णतामानामुळे माना टाकल्याचे चित्र आहे. तर पेरणीनंतर जिल्ह्यात अनेक भागात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी कसेबसे पीक जगविले. मात्र, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत पावसाअभावी भर पडली आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७०.४३ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वच शेतकºयांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे लावे लागेल, अशी सद्यस्थिती आहे.पावसाच्या दडीने वाढविली शेतकऱ्यांची चिंतारोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहेत.जुलै महिना उजाडूनही पावसाचा पत्ता नसून प्रखर ऊन आणि वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास तिबार पेरणी करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती