शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

इटलापूरवासीयांचा वस्ती सोडण्याचा निर्णय

By admin | Updated: April 29, 2016 02:01 IST

रस्ता ना वीज, पाणी ना इतर सुविधा, अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्न करीत समुद्रपूर नगर पंचायत हद्दीतील इटलापूरवासीयांनी वस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरी सुविधांचा अभाव : विकासकामांचा प्रस्तावही नाही सुधीर खडसे  समुद्रपूररस्ता ना वीज, पाणी ना इतर सुविधा, अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्न करीत समुद्रपूर नगर पंचायत हद्दीतील इटलापूरवासीयांनी वस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी या निर्णयाची अंमलबजावणीही केली आहे. असे असताना या गावाच्या विकासाकरिता पालिका प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळताच विकासाकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याच्या खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे; मात्र या प्रस्तावात गत ३० वर्षांपासून विकासाची प्रतीक्षा करीत असलेल्या या गावाकरिता कुठलाही विकास करण्याचा उल्लेख नाही. यामुळे येथील प्रशासनालाही या गावाचा विकास साधावा असे वाटत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. समुद्रपूर नगर पंचायत मतदार संघातील इटलापूर हे गाव नागरी सोई सुविधांअभावी रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. १९८५ मध्ये रमेश भोयर सरपंच असताना येथे एक कुपनलिका व सोर उर्जेवर चालणारे दिवे देण्यात आले होते. त्या वेळी या गावाची लोकसंख्या १५० च्या आसपास होती. आजच्या स्थितीत येथील कुपनलिका कोरडी पडली आहे. पाण्याची गरज भागविण्याकरिता नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे. गावात येण्याकरिता रस्त्याची सोय नाही. पावसाळ्यात रस्त्यावर होत असलेल्या चिखलातुन माणसाला सोडा जनावरांनाही चालने कठीण जाते. विजेची सोय नाही. अशा एका ना अनेक समस्या असलेल्या या गावात आज केवळ सात घरांची वस्ती शिल्लक राहिली आहे. इतर लोक बाहेर गावाला वस्ती करून वास्तव्यास आहेत. या ३० वर्षांपासून या गावात नागरी सोई सुविधा देण्याची मागणी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने आतापर्यंत अनेक कुटुंबांनी या गावाचा निरोप घेतला आहे.