शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील आहारामध्ये अनियमितता

By admin | Updated: September 22, 2014 23:24 IST

जिल्ह्यात सुमारे १३ आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे आहेत. यात अंदाजे १ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेतात़ सर्वच शासकीय वसतिगृहातील आहाराची

वर्धा : जिल्ह्यात सुमारे १३ आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे आहेत. यात अंदाजे १ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेतात़ सर्वच शासकीय वसतिगृहातील आहाराची व्यवस्था कंत्राट पद्धतीने करण्यात आली़ यात आहारामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़राजकीय वरदहस्त असलेल्या कंत्राटदारांना वसतिगृहातील आहाराचे कंत्राट दिले जात आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार शासन निर्णयाप्रमाणे दिला जात नाही. गरीब आदिवासींच्या मुलांच्या दररोजच्या जेवणातील घास चोरला जातो़ असे कृत्य करणाऱ्यांवर शासनाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही अवचित सयाम यांनी केली आहे़ शासन निर्णयानुसार आदिवासी वसतिगृहातील मुलांना दररोजचा व आठवड्याचा आहार नियमानुसार पुरवठा करणे अपेक्षित आहे. दररोज शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहु, बाजरी, ज्वारी, तांदुळ, डाळ, भाजीपाला आदी वस्तूंचा पुरवठा अमर्यादित करण्यात यावा. अल्पोपहारात विद्यार्थ्यांना उसळ, पोहे, उपमा, शिरा यापैकी एक, दूध २५० मिली (साखरेसह), उकडलेली दोन अंडी दररोज, शाकाहारी मुलांसाठी कॉर्न प्लेक्स (सिरीअल) प्रत्येक दिवशी एक, सफरचंद व ऋतुमानाप्रमाणे मिळणारे एक फळ देणे बंधनकारक आहे़ शाकाहारी विद्यार्थी प्रत्येक वेळी दोन भाजी, वरण, दही व भात, एक गोड पदार्थ आठवड्यातून दोन वेळा, दररोजच्या प्रत्येक जेवणात कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सलाड व ५० ग्रॅम गावरान तूप देणे बंधनकारक आहे़ असे असताना यात कुचराई केली जात असल्याचेच दिसून येत आहे़आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारावर शासन निर्णयाप्रमाणे खर्च करण्यास सांगितले जाते़ आदिवासींची मुले-मुली जंगलातून येऊन शहरात खोली करून शिक्षण घेऊ शकत नाहीत. ते कुपोषित राहू नये, भारतीय राज्य घटनेच्या कलम ४६ प्रमाणे त्यांचे शैक्षणिक बाबीचे संरक्षण त्यांना मिळावे व अन्य समाजाप्रमाणे शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने शासन आदिवासींच्या मुलांची काळजी घेते़ एवढा त्यांच्या आहारावरचा खर्च शासन करीत असतानी त्यांना तो आहार व्यवस्थित मिळतो की नाही, याची तपासणी केली जात नाही़ यामुळे समाज सुधारक, आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वसतिगृहांना भेटी देऊन चौकशी करावी, अशी मागणी अवचित सयाम यांनी केली आहे़ विद्यार्थ्यांच्या आहारात कुचराई करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या शासनाकडे तक्रारी करीत कंत्राट रद्द करावे, अशी मागणीही निवेदनातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)