शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक अभियंत्यांकडून ‘कुऱ्हा’ जलाशयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुºहा जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ...

ठळक मुद्देप्रकल्पाच्या भिंतीला तडे गेल्याने नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुºहा जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी जलाशयाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. तर रविवारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी रसुलाबाद नजीकचा कुऱ्हा जलाशय गाठून जलाशयाला ज्या भागात तडे गेले त्या भागाची बारकाईने पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याने नागरिकांमध्ये धरणफुटीबाबत कमालीची दहशत पसरली आहे.रसूलाबाद नजीकच्या बाऱ्हा सोनेगाव व कुरझडी या गावाच्या मधात कुऱ्हा हा लघु जलाशय आहे. सुमारे ३७ हेक्टरवर पसरलेल्या या जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे ३ दलघमी असून तो सध्या १०० टक्के भरला आहे. अशातच पूर्णपणे मातीने तयार करण्यात आलेल्या या जलाशयाच्या भिंतींना तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा या उद्देशाने महसूल विभागाच्यावतीने कुऱ्हा जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या बाºहा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांतील १४३ व्यक्तींना रसुलाबाद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हलविण्यात आले आहे. शनिवारी नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.बी. काळे आदी अधिकाऱ्यांनी कुऱ्हा जलाशयाची पाहणी केली.त्यानंतर रविवारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी सदर जलाशयाची पाहणी केली. यावेळी वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, उपकार्यकारी अभियंता दामोदरे, तलाठी भोले, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, हुसेनपूरचे सरपंच रवी कुरसंगे, पोलीस पाटील श्याम काकडे, माजी सरपंच शफीकुर रहेमान, आनंद राठी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Damधरण