शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांवर अन्याय; संभाजी ब्रिगेडचा पालिकेला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

पालिकेतील सफाई कामगार, घंटागाडी चालक डम्पिंगमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणाºया कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोगाप्रमाणे १३ ते १४ हजार वेतन असताना केवळ सात सहा ते सात हजार वेतन दिले जाते. नियमाप्रमाणे २६ दिवस कामाचे असताना धमकावून ३० दिवस काम करून घेतले जाते तसेच कामाचे आठ तास असताना नियमबाह्य पद्धतीने दहा तास काम करून घेतले जाते.

ठळक मुद्देसंडे अँकर । विविध मागण्या रेटल्या, अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी संभाजी ब्रिगेडने प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात पालिकेला घेराव घातला.पालिकेतील सफाई कामगार, घंटागाडी चालक डम्पिंगमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोगाप्रमाणे १३ ते १४ हजार वेतन असताना केवळ सात सहा ते सात हजार वेतन दिले जाते. नियमाप्रमाणे २६ दिवस कामाचे असताना धमकावून ३० दिवस काम करून घेतले जाते तसेच कामाचे आठ तास असताना नियमबाह्य पद्धतीने दहा तास काम करून घेतले जाते. या कामगारांना साप्ताहिक सुटी, बोनस, घरभाडे भत्ता, पगारी रजा देणे गरजेचे असताना कंत्राटदार या सुविधा देण्यास टाळाटाळ करीत आहे. कामगारांना सेफ्टी किट पुरविणे आवश्यक असताना त्याही दिल्या जात नाही आहे. कामगारांनी नियमाप्रमाणे वेतन मागितल्यास कंत्राटदार चिन्मय कोठेकर आणि सुशांत मुळे यांच्याकडून कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. कामगारांवरील या अन्यायाविरुद्ध नगर पालिकेला घेराव घालण्यात आला. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन दिवसांचा अवधी देण्यात आला. कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व अन्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर सोमवारी पुन्हा घेराव घालण्यात येईल, असा इशारा तुषार उमाळे यांनी दिला. त्यांनतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. पालिकेतील ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केलीे.यावेळी अशोक वेले, राहुल बोबडे, रूपेश वाघमारे, पंकज सत्यकार, गजानन सातव, प्रशिक बैले, राहुल गजभिये, मयूर नगराळे, सागर जवादे, वैभव कदम, बादल जोगे, आधार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, अ‍ॅड. अरुण येवले २०० ते ३०० कंत्राटी कामगारांचा मोर्चात सहभाग होता.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड