शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

४२,३५० रुपयांच्या खर्चात ४,५०० रुपयांचे उत्पन्न

By admin | Updated: December 7, 2014 22:55 IST

यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून

खरिपाने दिला दगा : नापिकीच्या अवस्थेत कर्ज फिटता फिटेना; शेतकरी चिंतातुर
वायगाव (निपाणी) : यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला. या पाच एकरात त्याला केवळ चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न झाले. या उत्पन्नात घेतलेले कर्ज फेडावे वा इतर खर्च करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. ही अवस्था कमी अधिक फरकाने जिल्ह्यात एकाची नाही तर अनेकांची आहे.
वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) येथील शंकर श्यामराव टोपले यांनी आलोडा (बोरगाव) शिवारातील त्यांच्या शेताता सोयाबीनचा पेरा केला. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांनी मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रुपये खर्च केला. शेतातील सोयाबीनची सवंगणी करून त्याच्या घरात केवळ चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न आले. यामुळे त्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. जिल्ह्यात उत्पन्नात तोटा येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत आहे.
कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने ती परिस्थिती यंदा उलट झाली. शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने ज्वारीच्या दान्याएवढे सोयाबीन झाले. बँकाचे कर्ज काढून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात आलेला तोटा हा शेतकऱ्यांना आणखीच अडचणीत आणणारा ठरला. पूर्वी शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेत होता. तणनाशक उपलब्ध नसतानाही हजारो रुपये निंदन व डवरणीसाठी खर्च करूनही किमान एकरी आठ ते १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न निघत होते. एकरी उत्पादन खर्च २० हजाराच्या जवळपास गेल्यास ४० हजारापर्यंत उत्पादन होत होते. मात्र या यंदाच्या हंगामात त्याच्या उलट झाले. (वार्ताहर)