शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या घराला आग लावणाऱ्यास दंडासह कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:34 IST

भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उर्फ गुड्डू चिंतामण शेंडे (४१) रा. सावंगी (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : आईनेच दिली साक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उर्फ गुड्डू चिंतामण शेंडे (४१) रा. सावंगी (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, २९ मार्च २०१७ ला रात्री आरोपी लोकेश शेंडे याने त्याची पत्नी, तीन मुली व एक मुलगा तसेच आई राहत असलेल्या घराला पत्नी सोबत पटत नसल्यामुळे पेट्रोल टाकून आगीच्या हवाली केले. फिर्यादी आई सुशीला चिंतामण शेंडे हिने आरोपी लोकेश यास पेट्रोल टाकून पळून जाताना प्रत्यक्ष पाहिले होते. आगीमुळे घरातील कपडे, गादी, इलेक्ट्रिक बोर्ड आदी साहित्य जळाल्याने त्यांचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार जळालेला माल जप्त करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी देखील त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३८०, ४५७ तसेच दारूबंदी कायदा आणि हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपी काही दिवसापूर्वीच नागपूर येथील कारागृहातून सुटला होता. तपासादरम्यान आरोपीविरूद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी आईनेच मुलाविरुद्ध साक्ष कायम ठेवल्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला. या प्रकरणाचा तपास पोहवा प्रकाश निमजे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रकरण साक्षपुराव्यावर आले असता सरकारी अभियोक्ता व्ही.एन. देशमुख यांनी ३ साक्ष पुरावे नोंदविले आणि युक्तिवाद केला. साक्षपुरावे व युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी आरोपीस सदर शिक्षा ठोठावली.