शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डातील सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करा

By admin | Updated: November 19, 2014 22:47 IST

रंग रसिया, हैदर, सिंघम रिर्टन आणि पूर्वीच्या ओ माय गॉड, रागिनी एम.एम.एस.२, भुलभुलैया आदी अनेक चित्रपटांतून राष्ट्रीय व हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा जाणीवपूर्वक अवमान केला आहे.

हिंदू जनजागृती समितीची मागणी : अधिकारी वर्गाला निवेदनवर्धा : रंग रसिया, हैदर, सिंघम रिर्टन आणि पूर्वीच्या ओ माय गॉड, रागिनी एम.एम.एस.२, भुलभुलैया आदी अनेक चित्रपटांतून राष्ट्रीय व हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा जाणीवपूर्वक अवमान केला आहे. समाजमनावर विपरित परिणाम करणाऱ्या अशा प्रकारच्या आक्षेपार्ह चित्रपटांना संमती देणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील सदस्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनानुसार अशा चित्रपटांच्या विरोधात अनेकदा तक्रारी आणि आंदोलने करूनही केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) काहीही करत नाही. त्यामुळे देश आणि धर्म हिताच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. दुसरीकडे हिंदु सोडून इतर धर्मियांच्या भावनांची दखल मंडळांकडून तात्काळ घेतली जात आहे. मंडळात भ्रष्टाचार होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डची सध्याची पूर्ण समिती विसर्जित करून हिंदुच्या भावानांची दखल घेणारी अन् संस्कृती जोपासणारी नवीन समिती गठीत करण्याची मागणी शिवाजी चौकात आंदोलकांच्या वतीने निदर्शनाद्वारे आणि निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंदळात शिवसेना सेलू तालुका प्रमुख पवन गोहत्रे, महिला शहर प्रमुख अमृता कोट्टेवार, जयश्री भुरे, भारती कोटंबकर, सोनाली लाडेकर, लता तिवारी, शशीकांत पाध्ये उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)