शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य नियुक्त्या; चौकशी झाली पण, कारवाईचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायत पातळीवरील कामकाज पारदर्शक व पेपरलेस करण्याकरिता आपले सरकार योजनेंतर्गत ई-ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. याकरिता खासगी कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करताना नियमबाह्यपणे अनेकांची नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी झाली पण, कारवाईचे घोडे कुठे अडले, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. कंपनीकडून जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली. संगणक परिचालकाची नियुक्ती करताना ती व्यक्ती गावातील किंवा ५ किलोमीटर अंतरावराच्या आतील रहिवासी असावी, असा आदेश आहे. परंतु व्यवस्थापकांनी शासनाचा आदेश डावलून स्वमर्जीने २० ते ४० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तींची निवड केली. काही तर दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून ते संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकील पालकमंत्री सुनील केदार यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करुन चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन ग्रामपंचायत, केंद्रचालकाचे नाव, केंद्रचालक रुजू होण्याचा दिनांक, केंद्रचालकाच्या राहण्याच्या ठिकाणापासून ग्रामपंचायतीचे अंतर, त्या चालका संदर्भात तक्रार प्राप्त झाली काय, आदी माहितीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. आता दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही कुठलीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुका संघटनांकडूनही तक्रार- ग्रामपंचायत संगणक परिचालक नेमणुकीत सीएसी-एसपीव्ही हा कंपनीकडून आर्थिक व्यवहार झाला असून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे जास्त अंतरावरील व्यक्तीची संगणक परिचालक म्हणून नियुक्ती केल्याची तक्रार संगणक परिचालक संघटना देवळी तालुका यांनी जिल्हा परिषद सदस्यांसह खासदारांकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीमध्ये तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या आठ संगणक परिचालकांची नावेही देण्यात आली होती. पण, त्यांच्याही तक्रारीवर काहीच कारवाई झाली नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही रोष व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत