शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

By admin | Updated: June 11, 2016 02:29 IST

शेळ्या खरेदी करण्याकरिता गावातील सावकाराकडून मासिक पाच टक्के शेकडा दराने कर्ज घेतले. ते कर्ज व्याजासह फेडण्याची तयारी दर्शवूनही दामदुप्पट व्याजाची मागणी सावकाराकडून करण्यात आली.

पत्नीचा आरोप : पुलगाव ठाण्यात तक्रार दाखल, कठोर कारवाईची मागणीवर्धा : शेळ्या खरेदी करण्याकरिता गावातील सावकाराकडून मासिक पाच टक्के शेकडा दराने कर्ज घेतले. ते कर्ज व्याजासह फेडण्याची तयारी दर्शवूनही दामदुप्पट व्याजाची मागणी सावकाराकडून करण्यात आली. शिवाय सावकाराकडून घरी, सार्वजनिक ठिकाणी कर्जाकरिता धमक्या, अपमानास्पद वागणूक देणे, मारहाणही करण्यात आली. अशातच इसारपत्र करून दिलेल्या शेतजमिनीची विक्री करण्याकरिता नोटीस पाठविल्याने मोहन भोयर (४०) यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पत्नी सुचिता भोयर यांनी पुलगाव पोलिसात केली. सुचिता भोयर यांनी सावकार हरिभाऊ साठे रा. नाचणगाव यांच्या जाचाला कंटाळून मोहन भोयर यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती-पत्नी, सासरे, दोन मुली असे कुटुंब तळणी (भागवत) येथे शेती व मजुरी करून जगत असल्याचे सुचिता यांनी सांगितले. २७ जून २०१३ रोजी मोहन भोयर यांनी शेतीचा इसार करून देत साठे यांच्याकडून शेळ्या घेण्याकरिता ४० हजार रुपये घेतले. पुढे सावकाराने ३० मे २०१४ ची खरेदी मुदत असल्याचे सांगत वकिलामार्फत नोटीस पाठविला. मोहन भोयर यांनी काही लोकांसोबत जाऊन सावकाराची भेट घेतली व व्याजासह एकूण ६० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली; पण सावकाराने शब्द फिरवून जादा व्याजाची मागणी करीत ९२ हजार रुपये मागितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर शिवीगाळ, धमक्या सुरू झाल्या. २ जून २०१६ ला पती हे श्याम बरडे यांच्यासोबत नाचणगाव येथील कृषी विभागाच्या कार्यालयात जात असताना सावकाराने त्यांना अडवून मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले. या अपमानास्पद वागणुकीने मनस्थिती खालावल्यने त्यांनी विष घेतले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर त्यांचा ८ जूनला मृत्यू झाला. ते अखरेपर्यंत सावकाराने केलेल्या छळामुळेच आत्महत्या करीत असल्याचे सांगत राहिले. मागील चार-पाच वर्षांत शेतीने दगा दिला. शेळ्या विकून बॅँकेच्या कर्जाचे हप्ते भरणे सुरू होते. उपचाराकरिता नातलगांनी ६० ते ७० हजार रुपये लावले. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढला आहे. घरातील कर्ता पुरुष गमावला. याला सदर सावकारच जबाबदार असून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुचिता भोयर यांनी केली आहे.(प्रतिनिधी)