शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ?

By admin | Updated: September 7, 2015 02:02 IST

येथील शासकीय मागासवर्र्गीय मुलींच्या वसतिगृहातून गुरुवारी (३ सप्टेंबर) पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय पूजा विघ्ने हिचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात शुक्रवारी आढळून आला.

धरणात सापडला मृतदेह : वसतिगृहातून बेपत्ता होती आष्टी (शहीद) : येथील शासकीय मागासवर्र्गीय मुलींच्या वसतिगृहातून गुरुवारी (३ सप्टेंबर) पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय पूजा विघ्ने हिचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात शुक्रवारी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. तिने धरणात आत्महत्या केली वा तिची हत्या करण्यात आली असा प्रश्न समोर येत आहे. पोलिसांच्या तपासातून सत्य पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रानुसार, नरसापूर येथील पुजा विघ्ने ही हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. परिस्थिती हलाखीची असल्याने ती वसतिगृहात राहायची. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला निघून गेली. त्यानंतर सायंकाळपर्र्यंत परतलीच नाही. वसतीगृह अधीक्षिका शोभा ठाकरे यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार आष्टी पोलिसात नोंदविली. यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या. अशातच शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पूजाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात तरंगताना बेलोरा येथील पोलीस पाटील रमेश गडलींग यांना दिसला. त्यांनी याची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविला. पूजा धरणावर गेली तेव्हा तिच्यासोबत आणखी एक मैत्रिण व दोन मित्र असल्याची माहिती आहे. पूजाचा चेहरा काळा पडला होता. जीभ बाहेर आली होती. डोके विचित्र अवस्थेत होते. यावरून तिची हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे. ही घटना वरवर आत्महत्या वाटत असली तरी पूजाची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस घटनेचा तळाशी जाण्याचे काम करीत आहे. ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे प्रकरणाचा तपास करीत आहे.(प्रतिनिधी)वसतिगृह वाऱ्यावरशासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये अनेक भोंगळ कारभार सुरू आहे. बाहेरील मुले मुलींच्या खोलीत येत असल्याची माहिती आहे. रात्री-बेरात्री असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वसतीगृहाचे कर्मचारी आपल्याच कामात व्यस्त असतात. विद्यार्थीनी कुठे गेल्या, केव्हा आल्या याची नोंद होत नाही. मुख्य गेट उघडेच राहते. चौकीदार बेपत्ता असतो. अधीक्षिका सतत गैरहजर राहतात. याचा फायदा इतरांना होत आहे.पोलीस तपासावर भिस्तपोलिसांनी पूजा हरविल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर रात्रभर तपास केलाच नसल्याची माहिती आहे. आता तर तिचा मृतदेह मिळाला. लवकरच शवविच्छेदन अहवाल येईल. यात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.