शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
5
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
6
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
7
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
8
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
9
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
10
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
11
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
12
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
13
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
14
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
15
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
16
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
17
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
18
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
19
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
20
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
Daily Top 2Weekly Top 5

समानाला समान तत्त्वावर आधारलेला होमिओपॅथीचा औषधोपचार

By admin | Updated: April 10, 2016 02:24 IST

एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अ‍ॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे.

जागतिक होमिओपॅथी दिन : रुग्णांचा कल वाढतोय
पराग मगर वर्धा
एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अ‍ॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे. पण या उपचार पद्धतीला आव्हान देत डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी समानाला समान या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धती नावारुपास आणली. आधुनिक विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर उतरू न शकलेली ही चिकित्सा पद्धती मात्र आज संपूर्ण जगात मान्यताप्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या चिकित्सापद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्याकडे आजही ‘लोहा लोहे को काटता है’ अशी म्हण प्रचलित आहे. विशेष म्हणजे हे आजघडीला वास्तव आहे. याचाच तत्त्वत: प्रयोग हॅनमन यांनी त्यांच्या उपचार पद्धतीत करून ही उपचार पद्धती नावरुपास आणली. ज्याप्रमाणे सापाच्या विषापासून सर्पदंशावरील औषध बनते तशाच प्रकारचे तत्त्व त्यांनी या उपचारपद्धतीत वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती ही मानवाच्या शरीरातच असते. त्यामुळे एखाद्या आजारावर औषध म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रतिजैविके न देता आजाराच्या लक्षणाशी साधर्म्य असणारी जैवकेच अत्यल्प प्रमाणात रुग्णांना दिली जातात. ही जैवकेच शरीरातील व्याधी बरी करण्यासाठी शरीरालाच बाध्य करतात असे हे शास्त्र सांगते.
वैद्यकीयशास्त्रात त्यामुळे या पद्धतीला स्थान दिले जात नसले तरी १७९० पासून आजपर्यंत या उपचारपद्धतीत आमूलाग्र संशोधन होऊन ही समाजामध्ये सर्वमान्य झाली आहे. प्रस्थापित अ‍ॅलोपॅथीला आव्हान देत ही उपचार आज भारतातही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. विशेष म्हणजे अ‍ॅलोपॅथीमध्ये बरे न होणारे अनेक असाध्य रोग या पद्धतीने बरे केल्याचा दावाही केला जात आहे.

ही पद्धती अतिशय संथपणे रुग्णांवर उपचार करते. अनेक वर्षांच्या संशोधनाअंती यात बरेच बदल झाले आहेत. जवळपास ४ हजार ५०० औषधी या उपचारपद्धतीत आज वापरली जात आहेत. व्यक्तीचा आजार बघून सुक्ष्म अध्ययनाद्वारे ईलाज केला जात असल्याने अचुक निदान केले जाते. विशेष म्हणजे यात कुठलाही दुष्परिणाम नाही. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
-डॉ. आनंद गाढवकर,
होमिओपॅथी तज्ज्ञ, वर्धा