शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द मुख्याध्यापक व शिक्षकांचे धरणे

By admin | Updated: September 21, 2015 02:04 IST

शालेय शिक्षण विभागाच्या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ..

मागण्यांचे शासनाला निवेदन : अध्यादेशातील तरतुदी अन्यायकारकंवर्धा : शालेय शिक्षण विभागाच्या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निदर्शने दिली. यावेळी संघटनेने केलेल्या मागण्यासंदर्भात शासनाला निवेदन सादर करण्यात आले. शिक्षणक्षेत्रात प्रचंड उलथापालथ होऊ घातली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायद्याची अंमलबजावणी राज्याच्या शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे या कायद्याच्या सोयीने अर्थ लावून शासन संभ्रमित, संदिग्ध आहे. १८ आॅगस्ट २०१५ चा निर्णय निर्गमित करताना ग्रामीण आणि शहरी विभागातील प्रत्यक्ष अडचणी व समस्यांचा कोणताही गंभीर विचार न करता शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात भीती आणि असंतोष पसरला आहे. माध्यमिक शाळेला शैक्षणिक व प्रशासकीयदृष्ट्या शाळा संहितेनुसार शाळा असेपर्यंत मुख्याध्यापक अनिवार्य असताना लहान शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद अतिरिक्त होत आहे. यामुळे अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरविले जात आहे. इयत्ता नववी आणि दहावीला शिक्षकांची संख्या प्रतितुकडी दीडऐवजी एक अशी कमी होत आहे. त्यामुळे संख्या कमी असताना शिक्षकांवर काम लादल्याचा प्रकार होत आहे. यात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. या अन्यायकारक आदेशामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होणार आहे. आरटीईनुसार प्रत्येक शाळेला तीन अंशकालीन शिक्षक अनुज्ञेय असणे गरजेचे आहे. या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक यांनी धरणे दिले. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी माजी खासदार विजय मुडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अजय वानखेडे, शिक्षण संस्था संचालक अध्यक्ष सतीश राऊत, हरिभाऊ दंढारे, प्रा. उषाकिरण थुटे, डॉ. अरविंद मालपे, अ‍ॅड. शोभा काळे, रमेश धारस्कर, प्रकाश गोडघाटे, शेष बिजवार, मनोहर बारस्कर, शालिनी वाळके, प्रदीप गोमासे व आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)